Android app on Google Play

 

जमायकन यारडीज

 


हे नाव आहे त्या दहशतीचे जिला ब्रिटन मध्ये राहणारे लोक थरथर कापतात. इंग्लंड मध्ये ड्रग्स चा पुरवठा असो किंवा हत्यारांची अवैध तस्करी. या अपराधांमध्ये ही संघटना युगांपासून अनभिषिक्त सम्राट आहे. ही संघटना कॉन्ट्रेक्ट किलिंग साठी देखील बदनाम आहे. जमायकन यार्डीज चे लोक पैसे घेऊन कोणालाही मृत्युच्या दरीत लोटू शकतात. या संघटनेच्या सदस्यांकडे जगातील सर्वांत प्राणघातक हत्यारांचा साठा आहे. तसे पाहिले तर ब्रिटन मध्ये कायद्याचे राज्य कायम आहे. परंतु अपराधाच्या काळ्या जगतात जमायकन यार्डीज ची सल्तनत आहे. जर एखादी वेगळी संघटना या धंद्यात उताराचा प्रयत्न करू लागली की समजून जावे, रक्तपात अटळ आहे. हेच कारण आहे की ब्रिटनमध्ये टोळीयुद्ध सामान्य गोष्ट आहे. इथे दर आठवड्याला ७० पेक्षा जास्ती गोळीबाराच्या घटना टोळीयुद्धामुळे होतात.