Android app on Google Play

 

यकूजा माफिया

 


या संघटनेची संख्या आहे 10 हजार! आकडा ऐकूनच तुम्ही हे समजू शकाल की जर या अपराधी संघटनेने एका वेळी एखाद्या देशावर हल्ला केला तर चांगल्यातल्या चांगल्या सेनेलाही त्यांना आवरताना नाकी नऊ येतील. यकूजा माफिया ही जगातील सर्वांत जास्त संघटित संघटना मानली जाते. गुन्हेगारी जगतातील ही एकमात्र अशी संघटना आहे जिची ओळख टैटू पाहून होते. संघटनेच्या प्रत्येक सदस्याच्या शरीरावर टैटू गोंदले जातात. खुनी लोकांच्या शरीरावर वेगळ्या प्रकारच्या नक्षीचे टैटू असतात तर पोर्न इंडस्ट्री चालवणाऱ्या गुन्हेगारांच्या शरीरावर वेगळ्या नक्षीचे टैटू असतात. या संघटनेचेह सदस्य धमकी देऊन खंडणी  वसूल  करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही ती संघटना आहे जिने अश्लीलता जगभरात पसरवली. हो, जगभरात पोचणाऱ्या ब्लू-फिल्म याच संघटनेकडून पुरवल्या जातात. पोर्न इंडस्ट्री चालवण्यासाठी ही संघटना जगातील हजारो स्त्री - पुरुषांना ब्लैकमेल देखील करतात. एवढेच नव्हे तर आपला धंदा मजबूत करण्यासाठी ही संघटना जगातील अनेक देशांमध्ये वेश्यावृत्ती चालवण्यासाठी मुली देखील पुरवतात. जगातील कोणत्याही देशाची सीमा ओलांडून प्रवेश मिळवणे हा या संघटनेच्या डाव्या हातचा मळ आहे. एका देशातून दुसऱ्या देशात लोकांना बेकायदेशीरपणे दाखल करण्यात या संघटनेने महारथ प्राप्त केली आहे. यकूजाला जगातील सर्वांत मोठी माफिया संघटना म्हटले जाते.