Android app on Google Play

 

सिलियन माफिया

 


इटली च्या सिलीयन माफिया समोर जगातील मोठ्या मोठ्या माफिया संघटना नतमस्तक होतात. कारण सिलीयान माफिया अशा लहान मोठ्या गुन्हेगारांच्या संरक्षणाची जबाबदारी घेते. ही संघटना अपराधांचे मोठमोठे सौदे करण्यात मध्यस्थी करण्यात पटाईत आहेत. हत्यारांचा पुरवठा करण्यात या संघटनेचा हात कोणीही धरू शकणार नाही. सर्वांत जास्त विध्वंसक हत्यार ही संघटना कोणत्याही देशात पोचवू शकते. या संघटनेचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यातील बहुतेक सदस्य एकमेकाला ओळखत नाहीत. एकमेकांच्या समोर आले तरी ते आपल्या साथीदाराला ओळखत नाहीत. केवळ सांकेतिक शब्द किंवा परवलीचा शब्द देऊनच ते एकमेकाना ओळखू शकतात. हेच कारण आहे की पोलिसांनी या संघटनेच्या कोणत्याही सदस्याला अटक केली तरी ते संघटनेच्या इतर सदस्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. या संघटनेचे अधिकारी अतिशय हुशार आहेत. ते संघटनेत नवीन सदस्यांना घेताना सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींचा पडताळा कसून घेतात, आणि त्यानंतर त्या सदस्याच्या अपराधांचे रेकॉर्ड पाहूनच आपल्या संघटनेत सामील करून घेतात.