Get it on Google Play
Download on the App Store

अलबेनियन माफिया


ही संघटना मुख्यत्वे करून अल्बानिया मध्ये सक्रीय आहे. परंतु त्यांच्या धंद्याचा विस्तार युरोप आणि अमेरिकेतही पसरलेला आहे. गुन्हेगारी जगतात या संघटनेला सर्वांत क्रूर मानले जाते. त्यांच्याबद्दल कोणताही अंदाज वर्तवणे अशक्य आहे. अमेरिका आणि युरोप मध्ये शरीर विक्रयाचे बहुतेक अड्डे या संघटनेच्या कृपेवर काम करतात. भोळ्या मुलींना शरीर विक्रयाच्या कोठ्यांमध्ये पोचवण्यात या संघटनेचे गुन्हेगार अतिशय कुशल आहे. एकदा का एखादी मुलगी यांच्या दुष्टचक्रात अडकली, की मग मृत्यूच तिची सुटका करू शकतो. जर एखाद्या मुलीने पळून जायचा प्रयत्न केलाच, तर ही क्रूर संघटना तिला असा काही भयानक मृत्यू देते की बाकी कोणतीही मुलगी ते पाहिल्यानंतर पल्लून जाण्याचा विचार देखील मनात अनु शकत नाही.  त्यांच्या चक्रात एकदा मुलगी अडकली की पोलीस देखील तिला सोडवू शकत नाहीत. संघटनेचा दुसरा धंदा आहे ड्रग्स ची तस्करी. अमेरिका आणि युरोप इथे तरुणांच्या नसांतून धाव गेह्णारे नशीले जहर अलबेनियन माफियाचीच देणगी आहे. दुसऱ्या गुन्हेगारी संघटना देखील या संघटनेच्या गुन्हेगारांना घाबरूनच आपापले धंदे करत असतात. शरीरविक्रय आणि ड्रग्स या धंद्यात ही संघटना अमेरिका आणि युरोप मधील अनभिषिक्त सम्राट आहे.