Android app on Google Play

 

रशियन माफिया

 


रशियन माफियाचे क्रौर्य जगभरात प्रसिद्ध आहे. यांच्या बाबतीत असे म्हटले जाते की जर यांचे कोणाशी शत्रुत्व झाले तर तो माणूस अतिशय निर्दय मरण मरतो. ही संघटना जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. तिच्यात कित्येक लाख अपराधी सामील आहेत. तिच्या कारवाया जगातील प्रत्येक देशात धडाडीने चालू असतात. संघटनेतील अपराधी गुंडगिरी साठी देखील प्रसिद्ध आहेत. एवढेच नव्हे तर या संघटनेचे जगातील अनेक दहशतवादी संघटनांशी गठबंधन आहे. याशिवाय जगभरात मानवी अवयवांच्या तस्करीसाठी ही संघटना ओळखली जाते. जगातील कोणत्याही देशात कधीही कोणाचीही हत्या करणे या संघटनेच्या लोकांसाठी डाव्या हातचा मळ आहे. रशियन माफियाच्या भागातून पोलीस देखील जीव मुठीत धरून जातात. ज्या भागात या संघटनेचे अड्डे आहेत तिथे सभ्य लोक फिरकत देखील नाहीत. जगातील कोणतीही संघटना रशियन माफियाशी शत्रुत्व घेण्याची हिम्मत करू शकत नाही.