Android app on Google Play

 

ड्रग कार्टेल

 


नावावरूनच लक्षात येईल की ही संघटना जगभरात नशिल्या पदार्थांची सर्वांत मोठी व्यापारी आहे. या संघटनेच्या मार्गात जो आड येतो तो मृत्युच्या दारी जातो. ही संघटना नक्की किती देशांमध्ये नाशिले पदार्थ पुरवते याचा नेमका आकडा देखील सांगता येणार नाही. जिथे या संघटनेचे साम्राज्य आहे तिथे अन्य कोणताही अपराधी टिकूच शकत नाही. ही संघटना केवळ ड्रग्स चा पुरवठा करत नाही तर जगातील अनेक देशांमध्ये नास्शिल्या पदार्थांची शेती देखील करवून घेतात. चरस, गांजा, कोकेन, स्मैक यांच्याशी निगडीत प्रत्येक व्हरायटी यांच्याकडे असते. या संघटनेचे बहुतेक सदस्य स्वतः देखील नशेच्या आहारी गेलेले असतात. हेच कारण आहे मोठ्यात मोठे गुन्हेगार देखील यांच्या समोर जायला कचरतात.