Android app on Google Play

 

ट्रायड्स

 


ट्रायड्स संघटनेत अत्यंत क्रूर आणि धोकादायक अपराधी सामील आहेत. हे गुन्हेगार लोकांना अनंत यातना देऊन ठार मारण्यात पटाईत आहेत. या संघटनेचे सदस्य पैशांसाठी काहीही करू शकतात. या संघटनेत अशा शातीर चोरांची जमात देखील आहे जी करोडो रुपयांवर अशा प्रकारे हात साफ करतात की समोरच्या माणसाला त्याचा पत्ताही लागत नाही. हे केवळ चीनच नव्हे तर मलेशिया, हॉंगकॉंग, तैवान आणि सिंगापूर यांच्याशिवाय अमेरिकेत सुद्धा कारवाया करण्यात सक्षम आहेत. तसे पाहिले तर त्यांचा खरा धंदा सुपारी घेऊन खून करणे हा आहे परंतु जर त्यांनी धमकी दिली तर लोक गुपचूप करोडो रुपयांची खंडणी देऊन निघून जातात. या संघटनेद्वारे अनेक देशांमध्ये ड्रग्स देखील पुरवली जातात.