Android app on Google Play

 

इस्रायली माफिया

 


इस्रायली माफियाचे लोक अर्ध्या जगात पसरलेले आहेत. या संघटनेतील गुन्हेगार मुलींना शरीर विक्रयाच्या धंद्यात अशा प्रकारे सामील करून घेतात की त्यांना कळत देखील नाही की आपण कधी गुन्हेगारी जगतात सामावलो गेलो आहोत. ही संघटना कित्येक देशांच्या गुप्तचर विभागाकडून मोठ्या रकमा घेऊन अन्य देशांच्या महत्त्वाच्या बातम्या पुरवते. या कामासाठी त्याच मुलींचा वापर केला जातो ज्या शरीर विक्रयाच्या धंद्यात आणल्या जातात. इस्रायली पोलीसांनी अनेक वेळा या संघटनेचा खात्मा करण्यासाठी मोहिमा चालवल्या आहेत. परंतु माफियाची पाळेमुळे एवढी मजबूत आहेत, की पोलीस त्यांचा केसही वाकडा करू शकले नाहीत.