Get it on Google Play
Download on the App Store

भारत-पाकिस्तान युद्ध (१९७१)

http://img.patrika.com/upload/images/2015/06/10/2-India-pakistan-war-1433915256.jpg

१९७१ मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले ज्यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा सपाटून पराभव झाला आणि एक नवे राष्ट्र बांग्लादेश निर्माण झाले. पाकिस्तानने तयारी करून पुन्हा उरलेले काश्मीर हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खडा मुकाबला केला आणि अखेर पाकिस्तानी सैन्याच्या १ लाख सैनिकांनी भारतीय सेनेच्या समोर आत्मसमर्पण केले आणि 'बांग्लादेश' नावाच्या एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला. इंदिरा गांधींनी इथे एक फार मोठी चूक केली. त्या हा काश्मीर प्रश्न कायमसाठी सोडवू शकल्या असत्या, परंतु जुल्फिकार आली भुट्टो यांच्या बोलण्यात येऊन त्यांनी पाकिस्तानचे १ लाख सैनिक सोडून दिले.
या युद्धानंतर पाकिस्तानला अक्कल अल्ली की काश्मीर हस्तगत करण्यासाठी आमने-सामने लढाईत भारताच्या समोर टिकाव धरणे अशक्य आहे. १९७१ मधल्या मानहानीकारक पराभवानंतर काबुल येथील पाकिस्तान मिलिट्री अकादमी मधील सैनिकांना या पराभवाचा बदला घेण्याची शपथ देण्यात आली आणि पुढच्या युद्धाची तयारी सुरु करण्यात आली परंतु अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडू लागली.
१९७१ ते १९८८ पर्यंत पाकिस्तानी सेना आणि कट्टरपंथी अफगाणिस्तान प्रकरणात अडकून राहिले. इथे पाकिस्तानी सेनेने स्वतःला गोरिला युद्धात मजबूत बनवल्र आणि युद्धाच्या नवनवीन पद्धती शिकून घेतल्या. या पद्धती आता भारतावर अजमावण्यात येऊ लागल्या. पाकिस्तानच्या या खेळत भारत सरकार गुंतत गेले आणि आजही गुंतून पडलेले आहे.