खलीफा आक्रमण
७ व्या शतकानंतर इथे अरब, तुर्क मुसलमानांनी आक्रमण करायला सुरुवात केली आणि काही इतिहासकारांमते इ.स. ८७० मध्ये अरब सेनापती याकुब एलेस याने अफगाणिस्तान आपल्या अधिकारात आणले.
भारतात एकीकडे राजांमध्ये वर्चस्वासाठी लढाई सुरु होती तिथे दुसरीकडे पश्चिम सीमा युनानी आणि फारसी आक्रमणांनी हैराण होती. पूर्व सीमेवर अनेक छोटी छोटी स्वतंत्र राज्य स्थापन झाली होती. अशातच इस्लाम चा उदय झाला आणि त्याने संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला.
साधारण इ.स. ६३२ मध्ये हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम याच्या मृत्युनंतर ६ वर्षांच्या आताच त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी सीरिया, मिस्र, उत्तरी अफ्रीका, स्पेन आणि इराण जिंकले. या दरम्यान खलिफा साम्राज्य फ्रांस च्या लायर नावाच्या स्थानापासून आक्सस आणि काबुल नदीपर्यंत पसरले होते.