Android app on Google Play

 

भारत-पाक युद्ध १९६५

 

http://images.jagran.com/images/28_08_2015-war1965.jpg

पाकिस्तानने आपल्या सैन्यबळावर १९६५ मध्ये पुन्हा काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये पुन्हा एकदा ते तोंडावर आपटले. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवाने हडबडून गेलेल्या पाकिस्तानने संपूर्ण देशात भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचे कार्य केले आणि पाकिस्तानची संपूर्ण राजनीतीच काश्मीरवर आधारित बनली म्हणजे सत्ता हवी असेल तर काश्मीर हस्तगत करतो असे सांगावे.
हे युद्ध झाले तेव्हा भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचा राष्ट्रपती होता जनरल अयुब खान. भारतीय फौजांनी लाहोरला लक्ष्य करून पश्चिम पाकिस्तानवर हल्ले केले. अयुब खानने भारताविरुद्ध पूर्ण युद्धाची घोषणा केली. ३ आठवडे चाललेल्या भीषण युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्तीने दोन्ही देश युद्धविराम करायला तयार झाले. ताश्कंत इथे शास्त्री आणि खान यांच्यात बैठक झाली आणि त्यांनी घोषणापत्रावर सह्या केल्या. त्यानुसार दोनही नेत्यांनी द्विपक्षीय मामले शांतीपूर्ण मार्गांनी सोडवण्याचा संकल्प केला. आपापल्या सेना १९६५ च्या आधीच्या सीमेवर परत बोलावण्यासाठी दोन्ही नेते तयार झाले. या तहानंतर केवळ एका दिवसातच लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला.