Get it on Google Play
Download on the App Store

भारत-चीन युद्ध १९६२

http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/1/1f/India-China.jpg/300px-India-China.jpg

चीनकडून भारतीय सीमा प्रांतावर आक्रमण. काही दिवस चाललेल्या युद्धानंतर एकपक्षीय युद्धविरामाची घोषणा. भारताला आपल्या सीमेतील ३८००० वर्ग किमी क्षेत्रावर पाणी सोडावे लागले.
चीनी नेता माओत्से तुंग ने ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर पुन्हा आपले नियंत्रण आणण्यासाठी १९६२ मध्ये भारताशी युद्ध छेडले. तर एका रिपोर्टमध्ये असा खुलासा आहे की चीनविरुद्ध भारत युद्धात पराभूत होण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच सर्वस्वी जबाबदार आहेत.
उल्लेखनीय गोष्ट अशी की भारताच्या त्या ३८००० वर्ग किमी भागावर आजही चीनचा कब्जा आहे. हैंडरसन ब्रूक्सच्या एका रिपोर्टच्या मदतीने पत्रकार नैविल मैक्सवेल ने दावा केला आहे की ६२ च्या या युद्धात झालेल्या भारताच्या पराभवाला फक्त आणि फक्त तत्कालीन पंतप्रधान नेहरुच कारणीभूत आहेत. नैविल त्यावेळी नवी दिल्ली इथे टाईम्स ऑफ लंडन साठी काम करत होते. १९६२ च्या युद्धानंतर भारत सरकारसाठी लेफ्टनंट जनरल हेंडरसल ब्रूक्स आणि ब्रिगेडियर पीएस भगत यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पराभवाला कारणीभूत ठरवले होते.