फारसी आणि युनानींचे आक्रमण
भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवरील भारतीय राज्यांना फारसी आणि युनानी पासून नेहमीच आक्रमणांचा धोका राहिला होता. आधी इथे कम्बोज, कैकेय, गांधार नावाची छोटी छोटी राज्य होती. भारताच्या वायव्य सिमेबाद्द्ल बोलायचे तर संपूर्ण अफगाणिस्तान आणि इराण चे समुद्री काही भाग केवळ होते. इथे हिंदुकुश नावाचा एक डोंगराळ भाग आहे, ज्याच्या पलीकडे कजाकिस्तान, रशिया आणि चीनला जाता येईल. इ.स.पू. ७०० वर्षांपर्यंत हे स्थान आर्यांचे होते.
.घुसखोरी : या सीमेवरील राज्यांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून अनेक फारसी आणि युनानी लोकांनी आपले अड्डे बनवल होते, दुसरीकडे अरबी लोकांनी देखील समुद्र किनाऱ्यावरील क्षेत्रात आपली व्यापारी ठिकाणे बनवून आपल्या लोकांची तिथली संख्या वाढवली होती. अफगाणिस्तान मध्ये आधी आर्यांचे कबिले खूप होते आणि ते सर्व वैदिक धर्माचे पालन करत असत, पुढे बौद्ध धर्माच्या प्रचारानंतर हे स्थान बौद्धांचा गड बनला. बामियान ही बुद्धांची राजधानी होती.