Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

https://sushantskoltey.files.wordpress.com/2010/03/mahabharata_bharatvarsh.jpg

आजपासून १२५५ वर्षांपूर्वी पर्यंत अखंड भारताच्या सीमेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, भूतान, बांगलादेश, बर्मा, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएत्नम, माल्षीय, जावा, सुमात्रा, मालदीव आणि इतर अनेक छोटी मोठी क्षेत्र होती. अर्थात सर्व क्षेत्रांचे राजा वेगवेगळ होते परंतु सर्व म्हणवले जात होते भारतीय जनपद. आज या संपूर्ण क्षेत्राला अखंड भारत म्हटले जाते. आज ज्याला आपण भारत म्हणतो, प्रत्यक्षात त्याचे नाव हिंदुस्तान आहे, जिथे इंडियन लोक राहतात. आधी हा फक्त भारत होता. जात, भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावावर अखंड भारताचे तुकडे तुकडे करण्यात आले आहेत. इथे आपण पाहणार आहोत असे ११ मोठे संघर्ष ज्यांच्यामुळे अखंड भारत नष्ट झाला आहे.
असे मानले जाते की प्राचीन काळी देवता आणि असुर यांच्यात युद्ध होत असे. एकीकडे जिथे देवतांच्या राजधानीला इंद्रलोक म्हटले जात असे तिथे असुरांची राजधानी पाताळात होती. हिमालयाच्या एका क्षेत्रात इंद्रलोक होते. प्रत्येकाला इंद्राच्या पदाची अभिलाषा होती. संपूर्ण भारतवर्षात देव संस्कृतीचे शासन होते. देव आणि असुर यांच्ण्यात १२ वेळा संपूर्ण धरतीच्या राज्यासाठी युद्ध झाले ज्याला देवासुर संग्राम म्हटले जाते. इंद्र हे एक पद होते, कोणा देवाचे नाव नाही. द्वापार युगापर्यंत एवढे देव इंद्रपदावर बसले आहेत - यज्न, विपस्चित, शीबि, विधु, मनोजव, पुरंदर, बाली, अद्भुत, शांति, विश, रितुधाम, देवास्पति आणि सुचि. अर्थात देवतांच्या अधिपतीला पराभूत करणारे खूप होऊन गेले जसे मेघनाद, रावण इत्यादी. देवासुर संग्रामाचा परिणाम असा झाला की असुर आणि सूर यांनी धरतीवर भिन्न भिन्न संस्कृती आणि धर्म यांना जन्म दिला आणि धरतीला आपसात वाटून घेतले. या संघर्षांमध्ये देवता नेहमीच कमजोर सिद्ध झाले आणि असुर ताकदवान.
या दरम्यान हैहय आणि परशुराम यांच्यातील युद्धाची चर्चा मिळते. त्यानंतर राम - रावण युद्ध झाले. रामाच्या जन्माला ७,१२९ वर्ष झाली आहेत. रामाचा जन्म इ.स.पू. ५११४ मध्ये झाला होता. राम आणि रावणाचे युद्ध इ.स.पू. ५०७६ मध्ये झाले होते म्हणजे आजपासून ७०९० वर्षांपूर्वी. तेव्हा प्रभू श्रीराम ३८ वर्षांचे होते. हे युद्ध ७२ दिवस चालले होते. राम - रावण युद्धानंतर दहा राज्यांचे युद्ध झाले. ऋग्वेदात या युद्धाची चर्चा मिळते. ही रामायण काळातील गोष्ट आहे. दसराज्य युद्ध त्रेतायुगाच्या अखेरच्या काळात लढण्यात आले. असे मानले जाते की राम - रावण युद्धानंतर १५० वर्षांनी हे युद्ध झाले होते. ऋग्वेदाच्या ७ व्या मंडलात या युद्धाचे वर्णन मिळते.
दसराज्य युद्धानंतर सर्वांत मोठे युद्ध महाभारताचे झाले. कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरव यांच्यात आजपासून ५००० वर्षांपूर्वी महाभारताचे युद्ध झाले होते.१८ दिवस चाललेल्या या युद्धात भगवान कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. कृष्णाचा जन्म इ.स.पू. ३११२ मध्ये म्हणजे आजपासून ५१२१ वर्षांपूर्वी) झाला. महाभारताचे युद्ध इ.स.पू. २२ नोव्हेंबर ३०६७ ला झाले होते. त्या वेळी भगवान कृष्ण ५५ - ५६ वर्षांचे होते.
या युद्धाचे सर्वांत भयानक परिणाम झाले. धर्म आणि संस्कृतीचा नाश झाला. लाखो लोक मारले गेले आणि लाखो महिला विधवा झाल्या आणि तेवढीच मुलं अनाथ झाली. इथूनच भारताची दश आणि दिशा बदलत गेली. या युद्धानंतर अखंड भारत विखरू लागला.... नवीन धर्म आणि संस्कृती यांचा जन्म होऊ लागला अनु हळू हळू सर्व बदलून गेले. चला पाहूयात कोणती आहेत ती युद्ध ज्यांनी भारताचा नकाशा बदलण्यास सुरुवात केली. भारताचे भाग्य इथूनच बदलायला लागले.