Android app on Google Play

 

मुहम्मद बिन कासिम

 

http://static.filmannex.com/users/galleries/298009/sikh-warrior-decapitation-470x352_fa_rszd.jpg

७ व्या शतकानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या हातातून निसटत गेले. ७ व्या शतकाच्या अखेरच्या काळात मोहम्मद बिन कासिमचे सिंध वर आक्रमण आणि नंतरच्या मुस्लीम शासकांकडून भारतात इस्लामिक शासनाचा विस्तार झाला. साधारण ७१२ मध्ये इराकी शासक अल हज्जाज याचा पुतण्या आणि जावई मोहम्मद बिन कासिम याने वयाच्या १७ व्या वर्षी सिंध आणि बाळूच अभियानाचे सफल नेतृत्व केले.
इस्लामी खालीफांनी सिंध फत्ते करण्यासाठी अनेक अभियाने चालवली. १० हजार सैनिकांचे एक दल उंट आणि घोड्यांसकट सिंधवर आक्रमण करण्यासाठी पाठवण्यात आले. सिंध प्रांतावर इ.स. ६३८ ते ७११ पर्यंत ७४ वर्षांच्या कालावधीत खालीफांनी १५ वेळा आक्रमण केले. १५ व्या आक्रमणाचे नेतृत्व मोहम्मद बिन कासिम याने केले.
मोहम्मद बिन कासिम एक अत्यंत क्रूर योद्धा होता. सिंधचे दिवाण गुंदुमल यांच्या मुलीने शिरच्छेद मान्य केला, परंतु मीर कासीम ची पत्नी बनणे नाकारले. त्याच प्रकारे तिथला राजा दाहीर (इ.स. ६७९ मध्ये राजा बनला) आणि त्याच्या पत्नींनी देखील आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. सिंध देशाच्या सर्वच राजांच्या कहाण्या अत्यंत मार्मिक आणि दुःखदायी आहेत. आज हा सिंध देश पाकिस्तानातील एक प्रांत बनून राहिला आहे. राजा दाहीर एकट्यानेच अरब आणि इराण च्या नराधमांशी लढत राहिला. कोणीही त्याला साथ दिली नाही, काही लोकांनी तर त्याच्याशी गद्दारी केली.