Android app on Google Play

 

भारत-पाक युद्ध (1947)

 

https://lh6.googleusercontent.com/XglqZs0dKDNuFDbNVkH9gNfG6YWjpQFyRvFRgNWrEEAmTrh6m1ortet7NTCnV359nUdh2-4DcqWxYwYJwqUTWT4Uz-tQCszleqm6SMMzvTy1xQk1rrQ7AnPaNQ5XdYKs4Q

भारतामध्ये ब्रिटीश राजवट दोन प्रकारे होती - पहिली कंपनी राजवट आणि दुसरी मुकुटाची राजवट. १८५७ पासून सुरु झालेले मुकुटाचे राज्य १९४७ मध्ये संपले. त्यापूर्वी १०० वर्ष कंपनीचे राज्य होते.
इतिहासकार मानतात की २०० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीच्या दरम्यान साधारण १९०४ मध्ये नेपाळला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आली. पुढे सन १९०६ मध्ये भूतान स्वतंत्र देश घोषित करण्यात आला. तिबेट १९१४ मध्ये भारतापासून अलग करण्यात आले. नंतर १९३७ मध्ये बर्मा वेगळा देश बनला. याच प्रकारे इंडोनेशिया, मलेशिया देखील स्वतंत्र राष्ट्र बनली. नंतर १९४७ मध्ये भारताचे आणखी एक विभाजन करण्यात आले. अर्थात या मुद्द्यावर अनेक इतिहासकारांत मतभेद आहेत.
१९४७ मध्ये भारताचे पुन्हा एकदा विभाजन झाले. माउंटबेटन, चर्चिल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना आणि लियाकत अली खान यांनी मिळून भारताचे तुकडे केले. विभाजन देखील जिना यांच्या अटीवर झाले. भारतापासून वेगळ झालेल्या भागांना पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) म्हणत असत. विभाजनानंतर पाकिस्तानची नजर होती काश्मीरवर. त्यांनी काश्मिरी लोकांना भडकवायला सुरुवात केली आणि शेवटी काश्मीरवर हल्ला केला.
२६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन शासक महाराजा हरीसिंह यांनी आपले संस्थान भारतात विलीन करण्याच्या कागद पत्रांवर सह्या केल्या होत्या. गव्हर्नर जनरल माउंटबेटन ने २७ ऑक्टोबरला याला मंजुरी दिली. या कायदेशीर कागदांवर स्वाक्षरी होताच समस्त जम्मू आणि काश्मीर, ज्यामध्ये पाकिस्तानने अवैध कब्जा केलेला भाग देखील येतो, भारताचे अविभाज्य अंग बनले होते. १९४७ रोजी विभाजित भारत स्वतंत्र झाला. त्या दरम्यान भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणाचे कार्य चालू होते. त्यामुळे या राज्यांमध्ये अस्थिरता आलेली होती.
अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटणी झालेली होती ज्यामध्ये क्षेत्रांचे निर्धारण देखील झालेले होते, परंतु तरी देखील जीनांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत २२ ऑक्टोबर १९४७ रोजी काबाईली लुटारुंच्या वेशात पाकिस्तानी सैन्य काश्मीर मध्ये घुसवले. वर्तमानातील पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा रक्तरंजित खेळ पाहून काश्मीरचे राजा हरीसिंह जम्मूला निघून आले. तिथून त्यांनी भारताकडे सैनिकी सहाय्य मागितले, परंतु सहाय्य पोचेपर्यंत खूप उशीर झालेला होता. नेहरूंची जिनांशी मैत्री होती. त्यांना वाटले नव्हते की जिना असे काही करतील, परंतु जिनांनी तसेच केले.
भारतीय सेना ओअकिस्तनि सैन्याचा धुव्वा उडवत त्यांनी अवैध कब्जा केलेला प्रांत पुन्हा आपल्या ताब्यात घेत वेगाने पुढे घोडदौड करत होती की मधेच नेहरूंनी ३१ डिसेंबर १९४७ ला यू.एन्.ओ. कडे अपील केले की त्यांनी पाकिस्तानी लुटारूंना भारतावर आक्रमण करण्यापासून रोखावे. याचे फळ म्हणून १ जानेवारी १९४९ ला युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करून कब्जा करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.
नेहरू मधेच उठून यू.एन्.ओ. कडे गेल्यामुळे युद्धविराम झाला आणि भारतीय सैन्याचे हात बांधले गेले ज्यामुळे त्यांना पाकिस्तानने अवौध कब्जा केलेले बाकी उरलेले प्रांत पुन्हा कधीही परत मिळवता आले नाहीत. आज काश्मीरमध्ये अर्ध्या भागात नियंत्रण रेषा आहे तर काही भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषा. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून सातत्याने गोळीबार आणि घुसखोरी चालूच असते.