Get it on Google Play
Download on the App Store

आणि गणित चुकले.....

अशा परिस्थितीतहि रामानुजमचे संशोधनकाम चालूच होते. स्फुरणारे नवीन सिद्धान्त लिहून काढले जात होते. त्याने पानेच्यापाने भरून जात होती. पुरी सिद्धता लिहून ठेवण्यात रामानुजमला अजूनहि रस नव्हताच. अल्पशिक्षित अशा त्याच्या पत्नीने मात्र असे सर्व कागद काळजीपूर्वक जतन केले. नवऱ्याचे काम काहीहि कळत नव्हते पण त्त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची वाताहतच झाली. पत्नीला थोडी पेन्शन मिळाली. शिवणकाम करून त्यात भर घालून तिने पुढे दीर्घ आयुष्य कष्टात घालवले. मूल नव्हतेच. मात्र उत्तर आयुष्यात तिने एक मुलगा दत्तक घेतला होता. याला जगात मोठा मान आहे एवढे तिला नक्की समजले होते. काही महिने असे गेले पण प्रकृति खालावतच जाऊन अखेर एप्रिल १९२० मध्ये रामानुजमच्या जीवनाचा दु:खद अंत झाला.  रामानुजमच्या धाकट्या भावांचे थोडेफार शिक्षण झाले व नोकऱ्या करून त्यानी आईला सांभाळले.  मद्रास युनिव्हर्सिटीने रामानुजमच्या अखेरच्या काळातील संशोधनाचे कागद त्याच्या पत्नीकडून थोडा मोबदला देऊन मिळवले व प्रसिद्ध केले. मात्र त्याची एखादी प्रतहि त्याच्या पत्नीला, पतीची आठवण म्हणून, दिली नाही.