Get it on Google Play
Download on the App Store

खर्चाचा प्रश्न

 कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन,  तिचा   मला ‘साक्षात्कार’ झाला आहे असे त्याने आईला समजावले. मोठमोठे लोक आपल्या मुलाला मानतात व कॉलेजात नापास झालेल्या आपल्या मुलाला खास शिष्यवृत्ति मिळते याचा कोठेतरी तिच्या मनावर ठसा उमटला असावा. तिने मान्य केले केंब्रिजला जावयाचे तर खर्चाचे काय हा प्रश्न होताच. हार्डी व त्याचा एक मित्र लिटलवुड यांनी व्यक्तिश: वर्षाला पन्नास पौंड खर्च करण्याची तयारी ठेवली होती. पण तेवढ्याने काहीच भागणार नव्हते. इंडिया ऑफिसने हात झटकले मात्र मद्रास युनिव्हर्सिटीने प्रवासखर्च व दोन वर्षांच्या खर्चासाठी ६०० पौंड एवढी भरघोस मदत दिली. त्यामुळे प्रश्न सुटला! १९१३ च्या मार्चमध्ये रामानुजम बोटीने केंब्रिजला रवाना झाला. ट्रिनिटी कॉलेजने त्याला हॉस्टेलला रहावयास जागा दिली व युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयाची कवाडे त्याला खुली झाली! प्रोफेसर हार्डीने त्याला आपल्या पंखाखाली घेतले. रामानुजमच्या प्रतिभेचा रथ आता चौखूर उधळू लागला!