Get it on Google Play
Download on the App Store

प्रदेशातील स्ट्रगल

हार्डीने रामानुजमला सर्व प्रकारे मार्गदर्शन केले. गणितसंशोधनावरचे रामानुजमचे प्रबंध आता विख्यात जर्नल्समधून प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे जुने काम व प्रचंड प्रमाणावरील नवीन कामहि गणितज्ञांपुढे मांडले जाऊ लागले. त्यावर चर्चा, वादविवाद, भेटीगाठी,सभा होऊ लागल्या. हार्डीच्या मनातील हेतु सफळ झाला. हार्डी हा रामानुजमचा नि:स्वार्थी मित्र व चाहता होता. गणितज्ञांच्या सभेपुढे रामानुजमच्या प्रमेयांवर हार्डी स्वत: चर्चात्मक प्रबंध सादर करी.
रामानुजमने इंग्लंडला येण्याचे ठरविले तेव्हा त्याने आईला वचन दिले होते कीं मला इंग्रजी पोषाख करावा लागेल, शेंडी काढावी लागेल, केस राखावे लागतील पण मी शाकाहार सोडणार नाही. ते वचन त्याने खाण्याचे फार हाल होऊनहि कधी मोडले नाही. मद्रासी पद्धतीचे शाकाहारी जेवण जसे जमेल तसे, मुळात सवय मुळीच नसूनहि, त्याला स्वत:लाच बनवावे लागे.