गणिताने तारले
केंब्रिज विद्यापीठाने रामानुजमला, अपवाद करून, कोणत्याही परीक्षेविना बी. ए. ची पदवी पूर्वीच दिली होती. नंतर एम. ए. हि दिली. केंब्रिजने त्याला फेलोशिप द्यावी अशी हार्डीची खटपट होती पण जमले नव्हते. हार्डी स्वत: रॉयल सोसायटीचा फेलो होता. इंग्लंडमधला तो सर्वोच्च सन्मान होता. हार्डीने रॉयल सोसायटीला आग्रहाने सुचवले की रामानुजमला फेलो म्हणून स्वीकृत करावे. १९१८ मध्ये त्याच्या खटपटीला यश येऊन रामानुजमला विद्येच्या क्षेत्रातील इंग्लंडमधील सर्वोच्च सन्मान, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, हा मिळाला! न्यूटनसारख्यांच्या पंक्तीत तो जाऊन बसला! त्यानंतर केम्ब्रिज बिद्यापीठानेहि त्याला फेलोशिप दिली.