कौटुंबिक तणाव
सर्व सन्मान व कीर्ति मिळवून पण आजारी अवस्थेत रामानुजम बोटीने भारतात परत आला. मुंबईला त्याच्या स्वागतासाठी आई व भाऊ होते पण कौटुंबिक कलहांमुळे त्याच्या पत्नीला कळवलेलेच नव्हते! ती माहेरीच राहात होती व नंतर ती भावाबरोबर घरी आली. रामानुजम मद्रासला व मग कुंभकोणमला गेला. त्या प्रांतातील मोठमोठ्या प्रसिद्ध डॉक्टरांची औषधयोजना चालू झाली. अनेक क्षेत्रातील थोर लोक येऊन भेटत होते व लागेल ती मदत करत होते. पत्नी त्याची सेवाशुश्रूषा मनापासून करत होती. सासवासुनांचे अजिबात पटत नव्हते व या आजारपणातहि त्यांची भांडणे अखंड चालू होतीं. अर्थातच रुग्णाला त्याचा त्रास होतच होता. डॉक्टरांचे असे स्पष्ट मत होते की मद्रासच्या दमट हवेत राहून सुधारणा होणार नाही. चांगल्या हवेच्या ठिकाणी राहून सर्व औषधोपचार काळजीपूर्वक केले पाहिजेत. रामानुजमच्या आईने याला नकार दिला व मुलगा माझ्याजवळच हवा असा हेका धरला. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येईना