Android app on Google Play

 

मायदेशी आगमन

 

एव्हाना युद्ध संपले होते. एकूण परिस्थिती पाहून, रामानुजमने भारतात परत जावे व प्रकृति सुधारल्यावर परत केंब्रिजला यावे असे हार्डीने सुचवले. आता पैशांचा प्रश्न नव्हता. मद्रास युनिव्हर्सिटीने त्याला वार्षिक २५० पौंडांची भरघोस शिष्यवृत्ति दिली होती. रामानुजम एवढा निरपेक्ष की त्याने मद्रासला कळवले की मला एवढ्या पैशांची गरजच नाही. माझा व कुटुंबाचा खर्च भागून उरणारी रक्कम इतर गरजू विद्यार्थ्याना द्या! अशा प्रकारे सर्व सन्मान मिळवून, पण गंभीर आजारी अवस्थेत, रामानुजम भारतात परत आला