एका सकाळी दंवाने भिजून...
एका सकाळी
दंवाने भिजून
चिंऽब गारठलेली
जुईची कळी
माझ्याकडे आली.
सोनेरी किरणांतून
मोहक हसली
गोरीपान दिसली
छानशी लाजली...
क्षणभर थबकली
गोंधळली,
बावरली....
माझी धुक्याची शाल पांघरुन
भुर्रकन पळाली.
मंदशी सुगंधी झुळुक हलकेच मोहरली.