गोवा मुक्ति-यज्ञ
आणा निज गोमंतक जिंकुनी घरा ।
कंठनाळ शत्रूचा सायकें चिरा ।
यज्ञ तो खरा ॥धृ०॥
फिरत फिरत पोर्तुगीज येथ पातला
अनुभविला नम्रभाव भारतांतला ।
कोप-यांत राज्याचा घाट घातला
भ्रष्ट करी भूमंदिर, फार मातला ।
भांडुनी करा । मुक्त मंदिरा ।
कंठनाळ शत्रूचा सायके चिरा ।
यज्ञ तो खरा ॥१॥
मोडती मराठे जे शत्रुचा कणा
पाठ फिरे तोंच उभा राहिला पुन्हा ।
चिमणाजी शौर्याने करित कंदना
हटला, परि झाला तो नामशेष ना ।
धन्व सावरा । योजुनी शरा ।
कंठनाळ शत्रूचा सायकें चिरा ।
यज्ञ तो खरा ॥२॥
पेटलें प्रचंड कुंड यज्ञदेवता-
तरुणरक्त हवनाला मागते स्वतां ।
दुष्ट फिरंगी हटवा मार मारतां ।
विजयाचा आणा हवि मुक्त भारता
जा त्वरा करा । संगरीं मरा ।
कंठनाळ शत्रूचा सायकें चिरा ।
यज्ञ तो खरा ॥३॥
कंठनाळ शत्रूचा सायकें चिरा ।
यज्ञ तो खरा ॥धृ०॥
फिरत फिरत पोर्तुगीज येथ पातला
अनुभविला नम्रभाव भारतांतला ।
कोप-यांत राज्याचा घाट घातला
भ्रष्ट करी भूमंदिर, फार मातला ।
भांडुनी करा । मुक्त मंदिरा ।
कंठनाळ शत्रूचा सायके चिरा ।
यज्ञ तो खरा ॥१॥
मोडती मराठे जे शत्रुचा कणा
पाठ फिरे तोंच उभा राहिला पुन्हा ।
चिमणाजी शौर्याने करित कंदना
हटला, परि झाला तो नामशेष ना ।
धन्व सावरा । योजुनी शरा ।
कंठनाळ शत्रूचा सायकें चिरा ।
यज्ञ तो खरा ॥२॥
पेटलें प्रचंड कुंड यज्ञदेवता-
तरुणरक्त हवनाला मागते स्वतां ।
दुष्ट फिरंगी हटवा मार मारतां ।
विजयाचा आणा हवि मुक्त भारता
जा त्वरा करा । संगरीं मरा ।
कंठनाळ शत्रूचा सायकें चिरा ।
यज्ञ तो खरा ॥३॥