अभियोगांतून सुटका
जिंकुनी मृत्यु आम्हांत आला हो
आरती प्रीतिची आपणांला ॥धृ०॥
व्यग्र कांता पुन्हा एकदा
ये अशी का अहेवी गदा
भेडसावीत वारा सदा-
तेवत्या शान्त नीरांजनाला
आरती प्रीतिची आपणांला ॥१॥
पुत्र विश्वास कन्या प्रभात्
काढती जागुनी रात रात्
वेढले मृत्युने पुण्य तात्
मुक्ततेने तयां मोद झाला
आरती प्रीतिची आपणांला ॥२॥
जागल्या सुप्त संवेदना
कंठ दाटे फुटे शब्द ना
अश्रु ओलांडती लोचना
आणि येती पुढे स्वागताला
आरती प्रीतिची आपणांला ॥३॥
धीर नेता स्थितप्रज्ञ तो
आसवे दोन कां ढाळतो
शोक आनंद वा क्रोध तो
अर्थ राही जले झाकलेला
आरती प्रीतिची आपणांला ॥४॥
आरती प्रीतिची आपणांला ॥धृ०॥
व्यग्र कांता पुन्हा एकदा
ये अशी का अहेवी गदा
भेडसावीत वारा सदा-
तेवत्या शान्त नीरांजनाला
आरती प्रीतिची आपणांला ॥१॥
पुत्र विश्वास कन्या प्रभात्
काढती जागुनी रात रात्
वेढले मृत्युने पुण्य तात्
मुक्ततेने तयां मोद झाला
आरती प्रीतिची आपणांला ॥२॥
जागल्या सुप्त संवेदना
कंठ दाटे फुटे शब्द ना
अश्रु ओलांडती लोचना
आणि येती पुढे स्वागताला
आरती प्रीतिची आपणांला ॥३॥
धीर नेता स्थितप्रज्ञ तो
आसवे दोन कां ढाळतो
शोक आनंद वा क्रोध तो
अर्थ राही जले झाकलेला
आरती प्रीतिची आपणांला ॥४॥