Get it on Google Play
Download on the App Store

ध्यान पाहुनी गोष्टीवरती

मुले
अनंत जीवनकथा चेतवी उत्साहाची ज्योती ।
तात ! आपली कथा परंतू वीर विनायक होती ।
तुटला कां हो धागा? अथवा सांधा दुसरा आला ?
कथा विनायक आला केव्हां कसा मायदेशाला ॥१॥
निवेदक-
ध्यान पाहुनी गोष्टीवरती कथावयाला येई भरती ।
नव तरुणांनो ! जाऊ आपण मूळ कथेच्या ओघावरती ॥२॥
सूत्र कथेचे नाही सुटले, जरी तुम्हां ते अलग वाटले ।
नेता जीवनमार्ग चालता उपाख्यान त्या पथीं उमटले ॥३॥
ऐका ! चंचल अतर्क्य नियती विनायकाच्या कक्षेभंवती ।
आश्वासुनिया अथवा फसवुनि ऊन साउली खेळत होती ॥४॥
हो स्वच्छंदन पळांत बंधन हिसळी घुसळी सारे तनमन ।
अवकाशांतुन सोडी मारुत कधी झुळुक वा कधी प्रभंजन ॥५॥
कधी भाजते अंग उन्हाने बर्फाच्छादित कधी बंघने ।
तरी कराने धरलेला ध्वज होता फडकत आवेशाने ॥६॥
वाड्.मय जनजागृतिचे साधन करि विनायक पुस्तक लेखन ।
स्फूर्तिप्रद आख्याने लिहिली इतिहासाला शोधुन शोधुन ॥७॥
वाड्‍.मय होते ज्वालाग्राही त्याचे शत्रुला भय राही ।
झाली मुद्रित हळूच पुस्तकें आणि पसरली दिशांत दाही ॥८॥
गुप्तपणे पुस्तकें निघाली हिंदुस्थानामध्ये आली ।
संस्थेने त्या आधी होती चित्ते युवकांची नांगरली ॥९॥
बीजापरि ते वाड्‍.मय भिजले, रुजले, स्फूर्तीसवे उगवले ।
वाढत होती देशप्रीती नवतरुणांचे रक्त उसळले ॥१०॥
निर्यातीला युक्ति योजिली पुस्तकांतुनी शस्त्रे गेली ।
सशस्त्र झाला अभिनव भारत जशी पिस्तुले हाती आली ॥११॥
भारतमाता की जय बोला शस्त्र मिळाले कान्हेरेला ।
बार भयानक उडतां त्याशी सावरकर संबंध जोडला ॥१२॥
भडका झाला जो वै-याचा माग काढला विनायकाचा ।
आणि घेरले रिपुने त्याला अंत कराया आयुष्याचा ॥१३॥
नेले त्याला नौकेवरती आणायाला पुन्हा भारती ।
सुटला होता ! परी गवसला ! देशाची होती कर्मगती ॥१४॥
विनायकाच्यासह कांही क्षण सागरावरी जाऊ आपण ।
बघूं तयाची अतर्क्य लीला कसा झुंजला एकाकी रण ॥१५॥

जय मृत्युंजय

गोपाळ गोडसे
Chapters
तो वीर विनायक अमर तो काळ असा होता विनायक आला जन्माला उष्ण आसवे नेत्री जमली मूर्ति दुजी ती दंग आज तांडवांत घेइ लाडके घास निरोपाचा गुरुदेव टिळक त्या शिष्य विनायक विलायती जाळा वस्त्रे आव्हानाया रिघे विनायक एक देव एक देश झालासां उत्तीर्ण परीक्षा देशा अर्पण हे आत्मार्पण एकमुखाने करुनि हकारा अमर होय ती वंशलता तडितरुप योद्वा कडाडला ध्यान पाहुनी गोष्टीवरती सन्मित्रांनो, घ्या प्रणाम फेकला देह मी सागरी सोडा रक्तांत खेळणे दोन जन्म काळे पाणी दगड मोगरीमधे सापडे तेंचि हो संसाराचे सार त्या डब्यांत होती मृत्यूची छाया अंदमानला निघे चलान तात्या ! तूं इथे कसा ? अंदमानचा अनभिषिक्त नृप येसूवहिनी कविता खेळत होती चाफ्याचे फूल कांचन चमचमले भूमिची लावली धूळ भाळाला हिंदु राष्ट्रध्वज जातपात गुणकर्मे येती विजयाचा सण आला लेखण्या मोडा रोख सैनिकांचा फिरवा पाकिस्तान निर्माण कराल तर.....e देश दास्यांतुनी मुक्त झाला गांधीहत्या अभियोग अभियोगांतून सुटका पराक्रमाने पुन्हा सोडविल ! धर्मान्तर हें राष्ट्रान्तर नृप मीच भारताला राष्ट्रपतीपद राहो ज्याचे त्याला दैव देतें कर्म नेतें गोवा मुक्ति-यज्ञ माईचा मृत्यू सेना समरांगणी रंगली होऊं मी का भार धरेवर तुझें रे कळलें जीवनसार निवडक अभंग संग्रह ७ प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31