एक देव एक देश
एक देव एक देश एक आशा । एक जाति एक जीव एक भाषा ।
आंग्लभूवरी भारतीय रत ।
राष्ट्राचे भवितव्य रंगवित ।
कसा असावा अभिनव भारत ।
मित्रांचा गण होता गात् ।
करुं संकटावरती मात् ।
खरा करुं पण ।
लढवोनी रण ।
घडवूं आपण-
एक देव एक देश एक आशा । एक जाति एक जीव एक भाषा ॥१॥
रणरंगण शब्दांकित करिती ।
आणि चरित्रें उदात्त लिहिती ।
विस्फोटक-संहिता शोधिती ।
युक्ति शक्तिचा घालित मेळ् ।
रसायनाशी करिती खेळ् ।
क्रांतीचे घर ।
भारत मंदिर ।
करण्या आतुर-
एक देव एक देश एक आशा । एक जाति एक जीव एक भाषा ॥२॥
वंग पंचनद आंध्र हिमाचल ।
महाराष्ट्र गुजराज नि उत्कल ।
एका भूचे प्यालेले जल ।
मातृभक्तिची एकचि हाव् ।
एकरुप झालेले भाव् ।
ह्रदयीं कोरत ।
जय जय भारत ।
सर्वांचे व्रत-
एक देव एक देश एक आशा ।
एक जाति एक जीव एक भाषा ॥३॥
आंग्लभूवरी भारतीय रत ।
राष्ट्राचे भवितव्य रंगवित ।
कसा असावा अभिनव भारत ।
मित्रांचा गण होता गात् ।
करुं संकटावरती मात् ।
खरा करुं पण ।
लढवोनी रण ।
घडवूं आपण-
एक देव एक देश एक आशा । एक जाति एक जीव एक भाषा ॥१॥
रणरंगण शब्दांकित करिती ।
आणि चरित्रें उदात्त लिहिती ।
विस्फोटक-संहिता शोधिती ।
युक्ति शक्तिचा घालित मेळ् ।
रसायनाशी करिती खेळ् ।
क्रांतीचे घर ।
भारत मंदिर ।
करण्या आतुर-
एक देव एक देश एक आशा । एक जाति एक जीव एक भाषा ॥२॥
वंग पंचनद आंध्र हिमाचल ।
महाराष्ट्र गुजराज नि उत्कल ।
एका भूचे प्यालेले जल ।
मातृभक्तिची एकचि हाव् ।
एकरुप झालेले भाव् ।
ह्रदयीं कोरत ।
जय जय भारत ।
सर्वांचे व्रत-
एक देव एक देश एक आशा ।
एक जाति एक जीव एक भाषा ॥३॥