फेकला देह मी सागरी
घेतले प्राण हातावरी ।
फोडूनी क्रूर कारातरी । फेकला देह मी सागरी ॥धृ०॥
मुक्त मी या क्षणीं
तोडूनी दावणी ।
ना क्षिती या पुढे जीव घेवो कुणी ।
वाहुनी दैव माथ्यावरी । फेकला देह मी सागरी ॥१॥
स्वस्थ शत्रू मनी
रोखुनी संगिनी ।
मान फासावया नेतसे बांधुनी ।
उर्मि आली जशी अंतरी । फेकला देह मी सागरी ॥२॥
मुक्तिचा भक्त मी
कोंडलेला तमीं
नौ-गवाक्षांतुनी जन्मभूतें नमी
छत्र वारी उषा अंबरी । फेकला देह मी सागरी ॥३॥
नष्ट हो दुर्दशा
बंधनाची निशा
भारता भानुचा रश्मि दावो उषा ।
अर्ध्य सूर्यासि देण्या करि । फेकला देह मी सागरी ॥४॥
सिद्व मी चेतना
तुच्छ मानी तना
वध्य ना छेद्य ना शोष्य ना क्लेद्य ना ।
निर्भये वावरे संगरी । फेकला मी देह सागरी ॥५॥
मारण्याला मला
शत्रु ना जन्मला
येत जों मारण्या तोंच भांबावला ।
दूर जाई भयाने अरी । फेकला देह मी सागरी ॥६॥
तोफ बंदूक वा
सैनिकांचा थवा
आवती भॊवती घालुं दे तांडवा ।
सत्य मी नित्य मी भूवरी । फेकला देह मी सागरी ॥७॥