Get it on Google Play
Download on the App Store

तो काळ असा होता

क्षणाक्षणाला छळत भारता होती परवशता,
कठिण तो काळ असा होता ॥धृ०॥
सत्तावनला कुंड पेटले, धगधगत्या ज्याला,
चालुनि गेले सैन्य, घातला शत्रुवरी घाला ।
नेते होते तात्या टोपे, धुंडिराज नाना
झांशीची संग्रामदेवता संगर करताना- ।
अडला घोडा परदास्याला उल्लंघुनि जाता,
कठिण तो काळ असा होता ॥१॥
अत्याचारा वाव मिळाला अता इंग्रजांना,
माणुसकीचा अंश अल्पहे उरला ना त्यांना ।
तोफेवर बांधून मारती स्वदेशभक्तांना,
कितीक पडती बळी बंदुकी आग वर्षतांना ।
अंदमान दाटले, कितींच्या फास येत हाता,
कठिण तो काळ असा होता ॥२॥
उपशम झाला क्रांतीचा त्या, मात्र मनी होती-
स्वातंत्र्याची तीव्र भावना कोठे धगधगती ।
मधुनी कूका, वासुदेव, ती ज्वाला चेतविती,
इंग्रजांस आगीवर होती सदाचीच भीती ।
कुणास देती दंड, कुणाला पदव्यांचा भत्ता,
कठिण तो काळ असा होता ॥३॥
निराशेतुनी राष्ट्रसभेचा तदा जन्म झाला,
एकराष्ट्र-भावना मात्र ये तेव्हां उदयाला ।
महाराष्ट्र-केसरी क्षणी त्या क्षितिजावर आला,
आशा वाटे सह्याद्रीची भारतमातेला ।
स्वातंत्र्याचा दुष्कर त्याच्या करी वसा होता,
कठिण तो काळ असा होता ॥४॥
वातावरणे अशी राहिली धूमिल योगयुती,
जन्मुनि तेव्हां करित होता विनायक प्रगती ।
लिही तयाच्या कष्ट अपेष्टा भालावरि नियती,
अंगावरले घाव तयाचे जीवन भूषविती ।
वज्राचे आघात झेलण्या सिद्व सदा नेता,
कठिण तो काळ असा होता ॥५॥

जय मृत्युंजय

गोपाळ गोडसे
Chapters
तो वीर विनायक अमर तो काळ असा होता विनायक आला जन्माला उष्ण आसवे नेत्री जमली मूर्ति दुजी ती दंग आज तांडवांत घेइ लाडके घास निरोपाचा गुरुदेव टिळक त्या शिष्य विनायक विलायती जाळा वस्त्रे आव्हानाया रिघे विनायक एक देव एक देश झालासां उत्तीर्ण परीक्षा देशा अर्पण हे आत्मार्पण एकमुखाने करुनि हकारा अमर होय ती वंशलता तडितरुप योद्वा कडाडला ध्यान पाहुनी गोष्टीवरती सन्मित्रांनो, घ्या प्रणाम फेकला देह मी सागरी सोडा रक्तांत खेळणे दोन जन्म काळे पाणी दगड मोगरीमधे सापडे तेंचि हो संसाराचे सार त्या डब्यांत होती मृत्यूची छाया अंदमानला निघे चलान तात्या ! तूं इथे कसा ? अंदमानचा अनभिषिक्त नृप येसूवहिनी कविता खेळत होती चाफ्याचे फूल कांचन चमचमले भूमिची लावली धूळ भाळाला हिंदु राष्ट्रध्वज जातपात गुणकर्मे येती विजयाचा सण आला लेखण्या मोडा रोख सैनिकांचा फिरवा पाकिस्तान निर्माण कराल तर.....e देश दास्यांतुनी मुक्त झाला गांधीहत्या अभियोग अभियोगांतून सुटका पराक्रमाने पुन्हा सोडविल ! धर्मान्तर हें राष्ट्रान्तर नृप मीच भारताला राष्ट्रपतीपद राहो ज्याचे त्याला दैव देतें कर्म नेतें गोवा मुक्ति-यज्ञ माईचा मृत्यू सेना समरांगणी रंगली होऊं मी का भार धरेवर तुझें रे कळलें जीवनसार निवडक अभंग संग्रह ७ प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31