तात्या ! तूं इथे कसा ?
बाबा पाही समोर अनुज लोहबद्व जसा ।
धक्क होय ह्रदय ! पुसे, तात्या तूं इथे कसा? ॥धृ॥
अंदमानच्या वनांत
बंधु बंधु भेटतात ।
तात्याची दु:खभार
बाबाला होता फार ।
स्वेदाने चिंब काय तृष्णेने शुष्क घसा ।
धक्क होय ह्रदय ! पुसे, तात्या तूं इथे कसा? ॥१॥
कायेचा तूं कोमल
नव-दीक्षित उच्छृंखल ।
सोन्याचे तुज यौवन
पाहिले न तूं जीवन ।
तूं इकडे आणि दूर भार्या तव मदालसा ।
धक्क होय ह्रदय ! पुसे, तात्या तूं इथे कसा ? ॥२॥
क्रांतीचा तूं गायक
स्वातंत्र्याचा नायक ।
होतिल अनुचर हतबल
पाहुनिया तुजसि विकल ।
खेळला कसा न कळे दैवाने खेळ असा ।
धक्क होय ह्रदय ! पुसे, तात्या तूं इथे कसा ? ॥३॥
कोण ही ध्वजा धरील
देशकार्य सावरील ।
झाकाळे धाराधर
मिहिराला खाय तिमिर ।
वाट बघे सूर्याची खिन्नपणे आज रसा ।
धक्क होय ह्रदय ! पुसे, तात्या तूं इथे कसा? ॥४॥
आम्ही पाइक तत्पर
लढविण्यासि हे संगर ।
सेनानी बद्व ! हाय !
काय त्यावरी उपाय ।
दु:खाने, क्रोधाने रडतें मन ढसा ढसा ।
धक्क होय ह्रदय ! पुसे, तात्या तूं इथे कसा ? ॥५॥