Get it on Google Play
Download on the App Store

येसूवहिनी

येसूबाई एक उपेक्षित जाय आजला पंचत्वाला ।
क्षणभर थांबा क्रांतिसतीला दोन आंसवे ढाळायाला ।
कुणी पाहिल्या स्वातंत्र्याच्या पायामधल्या शिला ?
नुमगे आम्हां कळस खरोखर त्यावरि आधारिला ॥
अभिनव भारत असिधाराव्रत । येसूबाई धरि अव्याहत ।
बाबांची ती सोज्वळ दारा । स्वतंत्र असुनी भोगत कारा ॥
बाळ नि तात्या दीरांवर ती । माया ओती आईपरती ।
सदैव झगडे दारिद्रयाशी । अर्धभुक्त वा कधी उपाशी ।
चिंता करतां एकदा पती । विनायकाच्या शुल्कावरती ।
येसू वहिनी देई अपुला । अलंकार मोडण्या पतीला ।
बहुमोलाचे आभूषण ते । परंपरेने आले होते ।
प्रेम त्याहुनी प्रिय वहिनीला । दीराचे, घर भूषविण्याला ॥
म्हणे शिक्षणी दीर असावा । अग्रेसर, तो घरा विसावा ।
सुवर्ण-भूषण शोभेहुनिही । अलंकार तो उज्वल राही ॥
साथीमध्ये जे बाळाला । होता ग्रंथिज्वर झालेला ।
रातंदिन कष्टली माउली । घालविली मृत्युची साउली ॥
त्या दिवसांहुनि अवघड आता । परिस्थितीचा फेरा होता ।
अंदमानला बाबा गेले । तात्याला त्या मागुति नेले ॥
बाळहि गेला कारागारी । कोण सतीचे दु:ख निवारी ।
म्हणती जन ही दाहक नारी । उभे करीना कोणी दारी ॥
कोणी जेव्हा आश्रय देती । आरक्षी पिच्छा पुरवीती ।
पायतळीची भूमि सरावी । आणि निर्धरा साध्वी व्हावी ॥
घ्यावा आश्रय काष्ठपटाचा । तवा तापला व्हावा त्याचा ।
जलांत जों प्रस्तर शोधावा । कासवापरी खडक बुडावा ॥
अंशुक जाडे भरडे ल्यावे । नियतीने ते हिसकावावे ।
अन्नाची जों चव चाखावी । मुखांत केवळ माती यावी ॥
देशभक्ति हा प्रमाद राही । तेव्हा पतिच्या संगे तीहे ।
आर्या होत्या जिवंत जळत्या । उपमा नाही त्यागाला त्या ।
मिळे न आम्हा अवसर पळभर । दोन आंसवे ढाळायाला ॥
एके दिवशी देव दयाळू करी कृपा तीवरी
उद्गघोषाविण देवलसी ती हौतात्म्यातें वरी ।
सावरकर कुलवधू अशी ती । अलिखित कारा भोगत होती ।
वनवास असा दमयंतीचा । कुठवर सांगा चालायाचा ॥
छल छळकाचा मन साहीना । कुणा कथाव्या तिने वेदना ।
प्रसन्न ठेवी मुद्रा वरुनी । विरहे जाई मन पोखरुनी ॥
केल्या होत्या किती खटपटी । भ्रतार भेटावा यासाठी ।
वर्षोवर्षे करी प्रतीक्षा । देशभक्तिची जणु ते शिक्षा ॥
शिक्षा त्यांची काय भयंकर । छाया मृत्यूची शय्येवर ।
उजाडता अंधार दिसावा । अंधारीही कोठचा दिवा ॥
जीवन जळते विरहाग्नीवर । मातृभूमिच्या पुण्य पदावर ।
एवढाच कां सुत हो तिजला । ऋण जन्माचे फेडायाला ॥
पूजा करतांना रातंदिन । पतिचे यावे मनांत चिंतन ।
बोले तुळसीला नवसाते । चुडा तुला गे वाहिन माते ।
माते माझा मिळावा पती । होइन तेव्हा सौभाग्यवती ।
वागवीन तें ऋण आजीवन । वाहिन देशासाठी नंदन ॥
शब्द नसे ते पुस्तक नाही । बुद्वि नसे तें मस्तक नाही ।
पृष्ठी भाता बाणावांचुन । भारभूत हो जगण्या जीवन ॥
विनती माझे ऐक भवानी । दु:खित विरही मी सुवासिनी ।
ना तरि हे आभूषण पोकळ । येवो माझ्या पूजेला फळ ॥
काळ लोटला द्रवले शासन । भेटीचे दिधले आश्वासन ।
लिहिले, जावे अंदमानला । पतिला अपुल्या भेटायाला ॥
परंतु काया थकली होती । गात्रे सगळी सुकली होती ॥
संदेशाचा वाहक आला ।"येसूबाई" पुसता झाला ।
तया दीर सामोरा जाई । संदेशाते ऐकुनि घेई ।
थट्टा भीषण झाली होती । दया नृपाची थिजली होती ।
वरात गेली घोडा आला । बैल पळाला झोपा केला ।
म्हणे दीर संदेशवाहका । दया आपली वापरु नका ।
कथा नृपाला कळला आशय । विलंब केला मात्र महाशय ।
दैववशात् जो नृपा लाभला । हट्टाने जो दाबुनि धरला ।
तो पवित्र अधिकार आपला । आहे मृत्युने हिरावला ।
श्रेष्ठ असे यम ! आपण नाही । व्रणितांची तो चिंता वाही ।
केली थट्टा अधिकाराची । आपण मागा क्षमा सतीची ॥
कणाकणाने जीवन जळले । पान वाळले भूवरि गळले ।
चिता पेटली जळली काया । उरली स्मृतिची केवळ छाया ॥
इतिहासाच्या पानावरती । या नारींची नावे नुरती ।
परंतु पाने सुटतिल सारी । धागे तुटले गुप्त हे जरी ॥
भेटीसाठी अंदमानला । नेई नारायण माईला ।
पाहुनि जाया वहिनीवाचून । विनायकाचे व्याकूळ हो मन ॥
कळले वहिनी भूवरि नाही । इतिहासाच्या उदरी जाई ।
वाण वाटली कलिकाळाला । ग्रंथ दिव्य तो बांधायाला ॥
स्फूर्तिची देवता हरपली । दु:खावेगे भेट करपली ।
विनायकाच्या अश्रू नयनी । येसूवहिनी ! येसूवहिनी !! ॥
थांबू येथे तिच्या स्मृतीला । दोन आंसवे ढाळायाला ॥

जय मृत्युंजय

गोपाळ गोडसे
Chapters
तो वीर विनायक अमर तो काळ असा होता विनायक आला जन्माला उष्ण आसवे नेत्री जमली मूर्ति दुजी ती दंग आज तांडवांत घेइ लाडके घास निरोपाचा गुरुदेव टिळक त्या शिष्य विनायक विलायती जाळा वस्त्रे आव्हानाया रिघे विनायक एक देव एक देश झालासां उत्तीर्ण परीक्षा देशा अर्पण हे आत्मार्पण एकमुखाने करुनि हकारा अमर होय ती वंशलता तडितरुप योद्वा कडाडला ध्यान पाहुनी गोष्टीवरती सन्मित्रांनो, घ्या प्रणाम फेकला देह मी सागरी सोडा रक्तांत खेळणे दोन जन्म काळे पाणी दगड मोगरीमधे सापडे तेंचि हो संसाराचे सार त्या डब्यांत होती मृत्यूची छाया अंदमानला निघे चलान तात्या ! तूं इथे कसा ? अंदमानचा अनभिषिक्त नृप येसूवहिनी कविता खेळत होती चाफ्याचे फूल कांचन चमचमले भूमिची लावली धूळ भाळाला हिंदु राष्ट्रध्वज जातपात गुणकर्मे येती विजयाचा सण आला लेखण्या मोडा रोख सैनिकांचा फिरवा पाकिस्तान निर्माण कराल तर.....e देश दास्यांतुनी मुक्त झाला गांधीहत्या अभियोग अभियोगांतून सुटका पराक्रमाने पुन्हा सोडविल ! धर्मान्तर हें राष्ट्रान्तर नृप मीच भारताला राष्ट्रपतीपद राहो ज्याचे त्याला दैव देतें कर्म नेतें गोवा मुक्ति-यज्ञ माईचा मृत्यू सेना समरांगणी रंगली होऊं मी का भार धरेवर तुझें रे कळलें जीवनसार निवडक अभंग संग्रह ७ प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31