गरुडाचे गर्वहरण
दुर्योधनाने पांडवांशी युद्ध न करता समेट करावा, स्वतःला बलाढ्य समजू नये असा उपदेश त्याला कण्व मुनी व इतर अनेकांनी केला. त्यावेळी कण्वाने ही कथा सांगितली. इंद्राचा मातली नावाचा सारथी होती. त्याला गुणकेसी नावाची सुंदर व गुणी मुलगी होती. तिला देव, दैत्य, गंधर्व, मनुष्य, ऋषी यांपैकी कोणीही वर पसंत पडेना. म्हणून तो पातालात नागलोकी वरसंशोधनासाठीनिघाला. वाटेत मातलीची वरुणाला भेटायला चाललेल्या नारदांशी अचानक गाठ पडली. ते दोघेही पातालदेशात निघाले. अनेक नगरे फिरल्यावर भोगवती नगरीतील सुमुख नावाचा नागराज मातलीला पसंतपडला. तो आर्यकाचा नातू व नागराज चिकूर याचा मुलगा होय. नागराज चिकुराला नुकतेच गरुडाने मारले होते व एक महिन्यो तो सुमुरवाला खाणार आहे अशी धमकी दिली होती. मातलीने आर्यकाला मदतकरण्याचे आश्वासन दिले.
नंतर सुमुखाला घेऊन मातली व नारद इंद्राच्या दर्शनाला गेले. दैवयोगाने भगवान विष्णूही तेथे आले होते. मग विष्णूने इंद्राला सांगून सुमुखाला उत्तम आयुष्य देवविले. सुमुख व गुणकेशीचा विवाह पार पडला. हासर्व वृत्तांत गरुडाच्या कानी गेलवर अत्यंत रागाने गरूड इंद्राकडे गेला व आपल्या ठरवलेल्या आहारात अडथळा आणल्याबद्दल त्याने त्याची निंदा केली. त्यावेळी गरूड असेही म्हणाला की ध्वजस्थानी राहून तोइंद्राचा भाऊ विष्णू यास वाहून नेतो. त्याच्याशिवाय इतका भार वाहण्यास कोण समर्थ आहे? वगैरे. त्या गर्विष्ठ गरुडाचे भाषण ऐकून विष्णूने त्याला सुनावले, "तू आत्मस्तुती करू नको. माझा भार वाहण्यास सारेत्रैलोक्यही असमर्थ आहे. तू फक्त माझ्या उजव्या बाहूचा भार सहन करून दाखव." असे म्हणून भगवंताने गरुडाच्या खांद्यावर आपला उजवा बाहू ठेवला. गरूड त्या भाराने विव्हळून बेशुद्ध पडला. मग त्यानेविष्णूंची क्षमा मागितली. भगवंताने गरुडावर कृपा केली. आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याने सुमुखाला गरुडाच्या छातीवर फेकले. त्या दिवसापासून गरूड सर्पासह असतो. याप्रमाणे गरुडाचे गर्वहरण झाले. यावरून धडा घेऊन भीमार्जुनांसारखे शूरवीर, कृष्ण यांच्यासह असलेल्या पांडवांशी दुर्योधनाने लढू नये असा उपदेश कण्व मुनींनी केला.