शिंदे कुळ-दुसरे
एका ग्रंथांत असे सांगितले आहे की, शिंदेपासून बारा शिंदे झाले, ते येणेप्रमाणे:-- शिंदा, शिशुपाळशिंदा, महत्काळशिंदा, सकरपाळशिंदा, जयशिंदा, विजयशिंदा, धुर्दयाशिंदा, नेकुळशिंदा, सितज्याशिंदा, इत्यादि बारा शिंदे झाले, त्यांची ओळख येणे- प्रमाणे:-सिंगण वेळ देवक तो कुर्वाशिंदा, मारवेळ देवक तो जयर्शिदा,कळंबाचें देवक तो विजयशिंदा, इत्यादि बारा शिंदे येणेप्रमाणे जाणावे असे एका प्रतीमध्ये लिहिले आहे.
- स्वैर अन्वय
या पुस्तकात असे सांगितले आहे कि, शिंदे कुळाच्या पायापासून बारा वेगळी कुळे तयार होतात. शिशुपाळ-शिंदे(शिशुपाल), महत्काळ-शिंदे, सकरपाळ-शिंदे (सकपाळ/संकपाळ/सपकाळ), जय-शिंदे(जयसिंग), विजय-शिंदे(विजयसिंग), धुर्द्या-शिंदे (धुरी-शिंदे), नेकुळ-शिंदे, सितज्या-शिंदे, इत्यादी ही आहेत. या कुळांची ओळख खालीलप्रमाणे होते. सिंगनवेल हे देवक कुर्वाशिंदे कुळाचे आहे, मारवेळ(मारव्याची वेल) देवक जयशिंदे(जयसिंग) कुळाचे आहे, कळंब देवक विजय-शिंदे(विजयसिंग) यांच्या कुळाचे आहे.ई. कुळे दुसऱ्या पुस्तकात लिहिलेली आहेत.