Get it on Google Play
Download on the App Store

दाभाडे कुळ

भद्रपाणि राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम दाभाडे, शांडिल्यऋषि गोत्र, कुळदैवत जोतीबा, अगोचरी मुद्रा, तारक मंत्र, तक्तगादी, द्वारकापट्टण, लग्नकार्यास देवक कळंबाचे, भगवी गादी, भगवे निशाण, जरदा वारू, विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र कट्यार पूजणे, यांची कुळे येणेप्रमाणेः-दाभाडे, निंबाळकर, राव, रणदिवे, निकम, असे दाभाडे जाणावे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे, असे हे दाभाडे जाणावे.

  • स्वैर अन्वय

दाभाडे कुळाचा पाया सोमवंशीय राजा भद्रपाणि याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र शांडिल्य आहे. दाभाडे कुळाचे कुलदैवत जोतिबा(ज्योतिबा) आहे. दाभाडे कुळाची गादी(सत्ता) द्वारका, गुजरात येथे आहे. दाभाडे कुळाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग भगवा आहे. या कुळाचा झेंडा भगवा असून त्यावर अगोचरी मुद्रा असलेल्या जर्द घोड्याचे भगव्या रंगाचे चिन्ह आहे. या कुळाचा यल्गार(एल्गार) तारक मंत्राचा आहे. या कुळामध्ये विवाह(लग्न) कार्यात देवक म्हणून कळंबाच्या झाडाचे किंवा फांदीचे पूजन होते. विजयादशमीला दाभाडे कुळाने कट्याराची पूजा करावी. दाभाडे कुळात निंबाळकर, लिंबाळकर, राव, लिंबराव, रणदिवे, निकम(निकुंब) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे शुभ्र(पांढरे) कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.