जगताप कुळ
वसुसेन राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम जगताप, दाल्भ्य ऋषि गोत्र, कुळदैवत खंडेराव, खेचरी मुद्रा, षडक्षरी मंत्र, तक्त गादी भरतपूर, ढवळी गादी, ढवळे निशाण, ढवळा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचे, आणि पिंपळाचे पान, विजया- दशमीस (दसऱ्यास) शस्त्र पूजणे तरवार. यांची कुळे येणेप्रमाणेः-जगताप १, शेलार २, मात्रे ३, सितोले ४. ही चार कुळे मिळोन जगताप जाणावे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे, असे जगताप जाणावे.
- स्वैर अन्वय
सोमवंशीय राजा वासुसेन याने जगताप कुळाचा पाया रचला. जगताप कुळाचे गोत्र दाल्भ्य (मांडव्य/जमदग्नी/च्यावन) आहे. जगताप कुळाचे कुलदैवत खंडोबा(खंडेराय/खंडेराव/खंडेराया) आहे. जगताप कुळाची गादी भरतपूर,राजस्थान येथे आहे. या कुळाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग पांढरा आहे. या कुळाचा झेंडा पांढऱ्या रंगाचा असून त्यावर खेचरी मुद्रेचा पांढरा घोडा आहे. जगताप कुळाचा यल्गार(एल्गार) षडाक्षरी मंत्र आहे. विवाह(लग्न) कार्यात जगताप कुळात कालाम्बाचे किंवा पिंपळाचे झाड किंवा फांदी याचे देवक पूजावे. विजयादशमीला तलवार हे शस्त्र पुरावे. जगताप कुळात शेलार(शिलाहार), म्हात्रे, सितोले(शितोळे) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. जानवे घालावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.