घुलप/धुमाल/धुले कुळ
महापाल राजा शेषवंशी त्याचे कूळ, उपनाम धुलप, कुळदैवत खंडेराव, भूचरी मुद्रा, मृत्युंजय मंत्र, तक्तगादी नाशिक, त्रिंबक आणि विजयदुर्ग, भगवी गादी, भगवें निशाण, भगवा वारू, जरीपटका, लग्नकार्यास देवक कळंबाचे आणि (लेंडपवार यांचें; लेंडसोन्याचे किंवा हळदीचे अथवा केतकीच्या आंतील गाभा). विजयादशमीस (दुसऱ्यास) शस्त्र खांडा पूजणे, यांची कुळे येणेप्रमाणे:-धुलप-धुमाल-धुले, धुरे, कासले, लेंडपवार. ही कुळे मिळून धुलप जाणावे. क्षत्रिय. सोव. धूत. गोग्रा. पुरा. असे धुलप जाणावे.
- स्वैर अन्वय
घुलप/धुमाल/धुले यांच्या कुलाचा पाया शेष(नाग)वंशीय राजा महापाल याने बांधला. या कुळाचे कुलदैवात खंडोबा(खंडेराव/खंडेराया/खंडेराय) आहे. यांची गादी(सत्ता) नाशिक, त्रिंबक, विजयदुर्ग या भागात आहे. या कुळाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग भगवा आहे, त्यांचा झेंडा भगवा असून त्यावर भगवा घोडा आहे. झेंड्याला जरीची किनार आहे. या कुळाच्या लोकांचा यल्गार(एल्गार) मृत्युंजयमंत्र आहे. घुलप/धुमाल/धुले विवाह(लग्न)कार्याला कळंबाचे किंवा हळदीचे झाड किंवा पान अथवा केतकी(केवडा)च्या आतला गाभा याचे पूजन देवक म्हणून करतात. विजयादशमीला या कुळाच्या लोकांनी खंडा या शस्त्राचे पूजन करावे. घुलप/धुमाल/धुले यांच्या कुळात धुरे(धुरी), कासले(कासळे/कसाळे), लेंडपवार(घोलप/धुमाळ/धुळे) यांचा समावेश होतो.यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.