मोरे/मौर्य कुळ
मांधाता राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम मोरे, ब्रह्मदश्वा ऋषि गोत्र, कुळदैवत खंडेराव, अगोचरी मुद्रा, मृत्युंजय मंत्र, तक्त गादी काश्मीर, भगवी गादी, भगवें निशाण, भगवा वारू, विजयादशमीस (दुसऱ्यास) शस्त्र पूजणे कटयार, लग्नकार्यास देवक मोराचें पीस, आणि ३६० तीनशे साठ दीप (दिवे). यांची कुळे:-मोरे, केशरकर, कलपाते आणि दरबारे. ही चार कुळे मिळून मोरे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे, असे मोरे जाणावे.
- स्वैर अन्वय
मोरे/मौर्य हे सोमवंशीय राजा मांधाता याचे कुळ आहे. मोरे/मौर्य या कुळाचे गोत्र भारद्वाज आहे. या कुळाचे कुलदैवत खंडोबा(खंडेराय/खंडेराया/खंडेराव) आहे. या कुळाची गादी(सत्ता) काश्मीरची आहे. मोरे/मौर्य कुलाच्या सिंहासनाच्या गादीचा रंग भगवा आहे. या कुलाच्या झेंड्याचा रंग भगवा असून अगोचरी मुद्रा असलेला भगवा घोडा आहे. या कुळाचा यल्गार(एल्गार) मृत्युंजय मंत्र आहे. विजयादशमीला मोरे/मौर्य कुळातील लोकांनी कट्याराचे पूजन करावे. विवाह(लग्न) कार्यात मोरे/मौर्य कुळात मोराचे पीस आणि ३६० दिवे याचे देवक म्हणून पूजन होते. मोरे/मौर्य कुळात केशरकर(केसरकर), मौर्य, कलपाते(कळपाते/कळपाटे/कळपे), दरबारे हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.