शिंदे कुळ
भद्रसेन राजा सूर्यवंशी त्याचे कुळ. उपनाम शिंदे, कौडिन्य ऋषि गोत्र, कुळदैवत जोतीबा, अलक्षमुद्रा, तारक मंत्र, तक्तगादी ग्वाल्हेर, पिवळी गादी, भगवे निशाण, पिवळा घोडा, लग्नकार्यास देवक कळंबाचे अथवा रुईचे, विजया- दशमीस (दसऱ्यास)शस्त्र तरवार पूजणे. हे शिंदे बारा असून एकच उपनांवाचे जाणावे क्षत्रिय धर्म चालवणे, सोंवळे धूतवस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे, ऐसे शिंदे जाणावे.
- स्वैर अन्वय
शिंदे कुळाचा पाया सूर्यवंशीय राजा भद्रसेन याने रोवला आहे. या कुळाचे गोत्र कौंडीण्य आहे. या गोत्राचे कुलदैवत जोतिबा(ज्योतिबा) आहे. यांची गादी(सत्ता) ग्वाल्हेरची आहे. या कुलाच्या सिंहासनाची गादी पिवळी आहे. याच्या झेंडा भगवा असून त्यावर अलक्षमुद्रा असलेला पिवळा घोडा आहे. या कुळाचा यल्गार(एल्गार) तारक मंत्र आहे. शिंपडे कुळात विवाह(लग्न) कार्यात कळंबाचे किंवा रुईचे झाड किंवा फांदी देवक म्हणून पूजले जाते. विजयादशमीला शिंदे कुळाने तलवारीची पूजा करावी. या शिंदे कुळात बारा आडनावाची कुळे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.