गायकवाड कुळ
कार्तवीर्य राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम गायकवाड, सनत्कुमार ऋषि गोत्र, कुळदैवत खंडेराव, भूचरी मुद्रा, मृत्युंजय मंत्र, तक्तगादी, गुजराथ देश, भगवी गादी, भगवे निशाण; भगवा किंवा लाल घोडा, विवाह (लग्न) कार्यास देवक उंबराचे, विज- यादशमीस (दुसऱ्यास) शस्त्र त्यागा पूजणे. यांची कुळे येणेप्रमाणेः-गायकवाड, पाटनकर. भाते ही तीन कुळे मिळून गायकवाड. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र नेसणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे असे हे गायकवाड जाणावे.
- स्वैर अन्वय
गायकवाड कुळाचे मूळ सोमवंशीय राजा कार्तवीर्यने रचले आहे. गायकवाड कुळाचे गोत्र संतकुमार(गौतम) आहे. गायकवाड कुळाचे कुलदैवत खंडेराव(खंडेराय/खंडोबा) आहे. या कुळाची गादी(सत्ता) गुजरात राज्य आहे. यांचे सिंहासन भगव्या गाडीचे आहे. यांचा झेंडा भगवा असून त्यावर भूचरी मुद्रा असलेला लाल किंवा भगवा घोडा आहे. गायकवाड कुळाचा यल्गार(एल्गार) मृत्युंजय मंत्र आहे. या कुळात विवाह(लग्न) कार्यात उंबराची पूजा होते. विजयादशमीला गायकवाड कुळाने शस्त्र पूजने टाळावे. गायकवाड कुळामध्ये पाटनकर(पाटणकर), भाते(भाटे/भाट्ये) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथींचे आदरतिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.