Get it on Google Play
Download on the App Store

तावडे/तायडे कुळ

नागानन राजा शेषवंशी त्याचे कूळ, उपनाम तावडे, विश्वावसु किंवा विश्वामित्र गोत्र, कुळदैवत जोगेशारी, अगोचारी मुद्रा, षडाक्षरी मंत्र, तक्तगादी, इंदुर, ढवळी गादी, ढवळ निशाण, ढवळा वारू, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचे किंवा हळदीचे पानाच, सोन्याचे पान. विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र कट्यार पूजणे, यांची कुळे येणेप्रमाणे तावडे, सांगल, नामजादे, जांबले, चिरफुले, ही कुळे मिळून तावडे. क्षत्रियधर्म चालविणे, सोवळे शुभ्र वस्त्र परिधान करणे, गोग्रास देणे, अतीत अभ्यागत पाळणे, पुराण श्रवण करणे, असे हे तावडे जाणावे.

  • स्वैर अन्वय

तावडे/तायडे कुळाचा पाया शेष(नाग)वंशीय राजा नागानन याने पाया उभारला आहे. तावडे/तायडे कुळाचे गोत्र विश्वामित्र आहे. तावडे/तायडे यांचे कुलदैवत जोगेश्वरी देवी आहे. यांची गादी(सत्ता) इंदौर येथे आहे. या कुळाच्या सिंहासनाची गाडी धवल(पांढरा) रंगाची आहे. या कुळाचा झेंडा धवल(पांढरा) रंगाचा असून अगोचारी मुद्रा असलेला धवल(पांढरा) घोडा आहे. लग्नकार्याला तावडे/तायडे कळंबाच्या झाडाची किंवा फांदीची तसेच हळदीच्या पानची, आपट्याच्या पानाची देवक म्हणून पूजा करतात. विजयादशमीला या कुळाने कट्याराची पूजा करणे. तावडे/तायडे या कुळामध्ये सांगल(सांगळ), नामजादे(नामजाडे), जांबले(जांभळे/जांबळे), चिरफुले, ही कुळे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे शुभ्र(पांढरे) कपडे परिधान करावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. अतिथीचे आदरातिथ्य करावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.