सावंत कुळ
भद्रसेन नामक राजा सोमवंशी त्याचे कूळ, उपनाम सावंत, दुर्वासऋषि गोत्र, कुळस्वामी जोतीबा, चाचरी मुद्रा, नरसिंह मंत्र, तक्तगादी गोव्याकडेस (सावंत वाडी) भगवी गादी, पिवळे निशाण, लोहबंदी वारू, जरीपटका, विवाह (लग्न) कार्यास देवक कळंबाचे आणि हस्तिदंत. विजयादशमीस (दसऱ्यास) शस्त्र तरवार पूजणे. यांची कुळे येणेप्रमाणे:-सावंत, कंबले, इनसूलकर, घाडगे ही पांच कुळे मिळून सावंत जाणावे. क्षत्रियधर्म चालवणे, सोवळे धूतवस्त्र परिधान करणे, यज्ञोपवीत (जानवें) घालणे, गोग्रास देणे, पुराण श्रवण करणे, असे सावंत जाणावे.
- स्वैर अन्वय
सोमवंशीय राजा भद्रसेन याने सावंत कुळाचा पाया रचला. या कुळाचे गोत्र दुर्वास आहे. या कुळाचे कुलदैवत करवीरचा जोतिबा(ज्योतिबा) आहे. सावंत कुळाची गादी(सत्ता) गोव्याकडची सावंतवाडी आहे. सावंत कुलाच्या सिंहासनाच्या गाडीचा रंग भगवा असून त्यांच्या झेंड्याचा रंग पिवळा आहे त्यावर चाचरी मुद्रेचा लोह्बंद घोडा आहे. या झेंड्याला जरीची किनार आहे. सावंत कुळाचे विवाह(लग्न) कार्याला कळंब आणि हस्तिदंत यांचे पूजन करतात. सावंत कुळाने विजयादशमीला तलवार शस्त्राचे पूजन करावे. सावंत कुळात कंबले(कुंबळे/कांबळे), इनसुलकर(इंदुलकर/इनदलकर), घाडगे(घाटगे) हे येतात. यांचे कार्य त्यांचा क्षत्रिय धर्म पाळणे आहे. सोवळे धुतलेले कपडे परिधान करावे. जानवे घालावे. गाईची काळजी घ्यावी तिला अन्न-पाणी द्यावे. पुराण ग्रंथ ऐकावेत.