इस्लाम विरोधी सर्वधर्मसमभाव
इस्लामच्या तत्त्वज्ञानानुसार अल्लाह ही एकमेव उपास्य देवता आहे. इस्लाम मधील तौहीद या संकल्पनेनुसार अल्लाह व्यतिरिक्त इतर कोणीही उपास्य नाही. इतर कोणत्याही देवतेची, अल्लाहशी तुलना वा बरोबरी केली जाऊ शकत नाही. अल्लाहची इतर कोणाशीही कोणत्याही प्रकारे तुलना करणे किंवा त्याला इतरांच्या समकक्ष मानणे इस्लाम विरोधी आहे. इस्लाम मध्ये त्याला शिर्क म्हणतात. जे इस्लाच्या शिकवणीच्या विरुद्ध असून सर्वात मोठे पाप समजले जाते. त्यामुळेच इस्लामच्या अनुयायांचा अल्लाह हाच एकमेव सर्वोच्च आणि सर्वोत्तम उपास्य देवता असून इतर कोणतीही देवता अल्लाहच्या समान मानणे हे इस्लामनुसार मोठे पाप आहे. इस्लामनुसार अल्लाहवर श्रद्धा असणारे आणि अल्लाहवर श्रद्धा नसणारे या दोन प्रकारात पृथ्वीवरील माणसांची विभागणी करण्यात आलेली आहे. इस्लामच्या तत्वज्ञानानुसार अल्लाहाला न मानणारे काफिर असतात. इस्लामचे तत्वज्ञान काफिरांशी अनैतिकतेने वागण्याचे समर्थन करते. इस्लामनुसार गैर इस्लामिक सैतान असून त्यांना नरकात जावे लागते. साहाजिकच इस्लामचे अनुयायी माणसा-माणसांत भेदभाव करतात. त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला त्यांच्या मनात किंचितही स्थान असू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी मुसलमानांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराण मधील काही आयती पाहू...
पवित्र महिने संपतील, तेव्हा मूर्तिपूजक जिथे जिथे दिसतील, त्यांची हत्या करा, त्यांना पकडा, त्यांना घेरा, वाट बघा, जर त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी प्रार्थना केली, नमाज पडला आणि जकात दिली तर त्यांचा मार्ग सोडून द्या. (कुराण- ९.५)
हे ईमान आणणाऱ्यांनो (मुसलमानांनो) त्या काफिरांशी (गैर मुसलमानांशी) लढा, जे तुमच्या आस-पास आहेत. (कुराण- ९.१२३)
ज्या लोकांनी आमच्या आयतांना (कुरानला मानण्यास नकार दिला) नाकारले आहे, त्यांना लवकरच आपण आगीत लोटू, जेव्हा त्यांची कातडी जळून जाईल, तेव्हा आपण त्यांची कातडी बदलूया, ज्यामुळे त्यांना यातनांची मजा मिळतच राहील. (कुराण- ४.५६)
हे इमान आणणाऱ्यांनो (मुसलमानांनो) आपल्या बापाला आणि भावाला आपला मित्र बनवू नका, जर त्यांना ईमान पेक्षा कुफ्र (अन्य धर्माला मानणे) पसंत असेल. तुमच्यापैकी जो कोणी त्यांच्याशी मित्रतेचे नाते जोडेल तो सुद्धा अत्याचारी असेल. (कुराण- ९.२३)
त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल, ज्याला त्याच्या रबच्या (ईशवरच्या) आयतींद्वारा आठवण करून देऊन सुद्धा तो त्याच्याकडे तोंड फिरवतो, निश्चितच आपण अशा अपराध्यांशी बदला घेऊ. (कुराण- ३२.२२)
हे नबी, काफिर (गैरइस्लामीक)आणि कपटी यांच्यावर जिहाद कर. त्यांच्याबरोबर कठोरपणे वाग. त्यांची जागा नरक आहे. ( कुराण- ९.७३)
तुम्ही त्यांच्याशी युद्ध करा, जोपर्यंत उपद्रव शिल्लक राहणार नाही आणि धर्म अल्लाहचा होईल. (कुराण- २. १९३)
अल्लाहच्या मार्गावर युद्ध करा, तुमच्यावर स्वतः शिवाय कोणाचीच जबाबदारी नाही. ईमान वाल्यांची कमजोरी दूर करा आणि त्यांना युद्धासाठी तयार करा. होऊ शकतं की अल्लाह काफिरांची ताकद कमी करेल. (कुराण- ४.८४)
ईमान आणणाऱ्यांनो (मुसलमानांनो) मुशरीक (अनेक देवतांना मानणारे) नापाक (अपवित्र) आहेत. ( कुराण- ९.२८)
निःसंदेह अल्लाहने जन्नतच्या बदल्यात मुसलमानाचा जीव आणि माल विकत घेतला आहे. ते अल्लाहाच्या मार्गावर लढतात, तेव्हा मारतात आणि मारलेही जातात. हे त्याने तौरात, इनजील आणि कुराणात दिलेले पक्के वचन आहे. अल्लाह शिवाय आपले वचन पूर्ण करणारा अजून कोण असू शकतो? तेव्हा आपण त्याच्याशी केलेल्या सौद्यावर आनंद साजरा करा, जो सौदा तुम्ही त्याच्याशी केला आहे. ( कुराण- ९.१११)
अल्लाहाच्या शत्रूंचा बदला आग आहे. तेच त्यांचे घर आहे, त्याच्या बदल्यात जे आमच्या (कुराणातील) आयतांना नाकारतात. (कुराण- ४१.२८)
अल्लाहने मूनाफिक (कपटी, ढोंगी) स्त्री, पुरुष आणि इस्लाम नाकारणाऱ्यांना नरकातील आगीचे वचन दिले आहे, ज्यात ते सदैव रहातील. तेच त्यांना पुरेसे आहे, अल्लाहला तुमची लाज वाटते आणि त्यांच्यासाठी याच यातना आहेत. ( कुराण- ९. ६८)
मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणमध्ये, इस्लामला, अल्लाहाला न मानणाऱ्यां विषयी वर दिल्याप्रमाणे स्पष्ट निर्देश दिलेले असल्याने, मुस्लिम धर्मीय हिंदूंशी वा इस्लाम व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्मियांशी सहिष्णुता किंवा सर्वधर्मसमभाव ठेऊन वागूच शकत नाही. त्यामुळे जरी भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले आणि ते हिंदूंनी मानले असले, तरी इस्लामच्या अनुयायांना सर्वधर्मसमभाव कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे सर्वधर्मसमभावची अपेक्षा फक्त आणि फक्त हिंदूंकडूच केली जात आहे; ही बाब जितक्या लवकर हिंदूंच्या लक्षात येईल, तितके त्यांच्यासाठीच हितकारक!
इस्लामच्या साम्राज्यवादी तत्वज्ञानानुसार जगाची दोन भागात विभागणी केली जाते. जो प्रदेश इस्लामच्या अधिपत्याखाली आहे त्याला 'दारूल इस्लाम' म्हणतात. तर जो प्रदेश इस्लामच्या अधिपत्याखाली नाही त्याला 'दारूल हरब' म्हणतात. दारूल इस्लामचा प्रदेश इस्लामच्या अधिपत्याखाली असल्याने तो इस्लामनुसार शांततेचा प्रदेश असतो. तर ज्या ठिकाणी इस्लामचे आधिपत्य नसते तो दारूल हरबचा प्रदेश इस्लाम नुसार युद्धभूमी मानला जातो. इस्लाम नुसार तथाकथित शांतता कायम करण्यासाठी दारूल हरबचा प्रदेश शक्य त्या मार्गाने दारूल इस्लामचा प्रदेश बनवणे हे मुस्लिमांचे पवित्र कर्तव्य आहे. उदा. १४ ऑगस्ट १९४७ पूर्वीचा अखंड भारत हा इस्लामच्या अनुयायांसाठी दारूल हरब चा प्रदेश होता. १४ ऑगस्ट १९४७ नंतर 'पाकिस्तान' हा इस्लामच्या अधिपत्याखाली आलेला प्रदेश दारूल इस्लाम चा प्रदेश झाला. याचाच अर्थ आजचा भारत हा इस्लामच्या अनुयायांसाठी, इस्लामचे आधिपत्य नसलेला 'दारूल हरब' चा प्रदेश आहे. इस्लामच्या तत्वज्ञानानुसार, इस्लामच्या अनुयायांसाठी भारत ही युद्धभूमी आहे! या युद्धभूमी भारताला म्हणजेच दारूल हरबच्या प्रदेशाला दारूल इस्लामचा प्रदेश बनवणे हे इस्लामच्या अनुयायांसाठी, इस्लाम नुसार पवित्र कर्तव्य आहे.
इस्लाम नुसार अल्लाहला न मानणारे गैरइस्लामीक लोक काफिर असतात. काफिर आणि इस्लामला मानणाऱ्यांचे ते काफिर असे पर्यंत म्हणजेच त्याने इस्लामचा स्वीकार केल्या खेरीज काहीही नाते असू शकत नाही. उदा. मुहम्मद पैगंबरांनी त्यांचे चुलते अबू तालिब हे मूर्ती पूजक असल्याने, त्यांच्याशी असलेले नाते तोडले होते. खुद्द पैगंबरांनी आपल्या वागण्यातून गैरइस्लामिक व्यक्तींशी आपले सौख्य असू शकत नाही हा पाया घालून दिलेला असतांना भारतात 'हिंदू-मुस्लिम भाई-भाई' कसे काय होऊ शकतात? हा प्रश्न तथाकथित सेक्युलर असणाऱ्या हिंदूंना पडू नये ही फार मोठी शोकांतिका आहे. जर हिंदू-मुस्लिम भाऊ-भाऊ होते तर धर्मावर आधारित पाकिस्तान या इस्लामिक राष्ट्राची मागणी करून मुस्लिम भारतापासून वेगळे का झाले? इस्लामिक राष्ट्रांच्या साम्राज्य विस्ताराचा रक्तरंजित इतिहास आपल्याला माहीत आहे का? ज्यांनी भारतावर आक्रमण करून भारतातील प्राचीन मंदिरे तोडली, बौद्ध विहार तोडले, तक्षशिला सारखी विद्यापीठे नष्ट केली, तलवारीच्या टोकावर हिंदूंना गुलाम बनवून त्यांचे धर्मपरिवर्तन केले, ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही आशा लाखो निष्पाप हिंदूंची, बौद्ध भिक्षूंची हत्या केली ते भाऊ-भाऊ कसे काय होऊ शकतात? इस्लामच्या तत्वज्ञानानुसार धर्मासाठी जिहाद करून त्यासाठी लढता-लढता शहीद होणे देखील पवित्र कार्य सांगितलेले असतांना इस्लाम आणि सनातन हिंदू धर्म समान कसे काय होऊ शकतात? हे प्रश्न चिंतीत करणारे आहेत.
वर उल्लेख केल्याप्रमाणे, इस्लामच्या तत्वज्ञानानुसार सर्व धर्म कदापी समान असू शकत नाहीत. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. तरी देखील भारतात सेक्युलर या भ्रामक संकल्पनेचा आधार घेऊन सर्व धर्मांना समान मानण्याची अपेक्षा केली जात असेल, तर ती कोणाकडून केली जात आहे? आणि का केली जात आहे? यावर हिंदू समाजाने चिंतन करणे आवश्यक आहे.