घाट व तेथे बांधलेले किल्ले
अंबाघाट - रसाळगड
कामथाघाट - कांगोरी
कुंडीघाट - मौजगड
कुंभार्ली घाट - जयगड
कुसूर घाट - भिवगड,टाकगड
पिपरी घाट - सुधागड
माताघाट - भवानगड
रणतोंडी घाट - प्रतापगड
विशालगड घाट - विशालगड,माचाळगड
शेवल्या घाट - मानगड
हे किल्ले म्हणजे एक प्रकारचे पहारेकरीच होते.तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून किनारपट्टीही सुरक्षित केली.त्यांनी तेथे प्रत्येक १० ते १२ मैलांवर सागरी किल्ला बांधला.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे ५२ किल्ले होते. पुण्यात ३० डोंगरी व २ भुईकोट असे ३२ किल्ले होते.ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले.
स्वराज्य अजिंक्य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.बारा मावळ क्षेत्रात असलेल्या ८ किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होते. ह्यास पूरक म्हणून त्यांनी त्याबाहेरही साल्हेर, मुल्हेर रोहिडा, रांगणा असे रिंगण तयार केले. त्यासोबतच त्यांनी सागरी किल्ल्यांचीही एक साखळी तयार केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांनी स्वराज्य अभेद्य ठेवले.
एकदा त्यांना पंत अमात्यांनी अर्ज केला" किल्ले बहुत जाहले.त्यांच्या मागे पैका विनाकारण खर्च होत आहे."
महाराजांचे उत्तर होते-
जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्यच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे.किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाइल पण तो आम्हाला जिंकु शकणार नाही त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जूने नवे अशे तीनशे साठ किल्ले आहेत.एक एक किल्ला तो १ वर्ष लढला तरी त्यास ३६० वर्षे लागतील.