अध्याय ३६
श्रीगणेशायनमः ॥ गुह्यांतरस्थितायासाब्रह्मांडावरणाद्वहीः ॥ शैवदेवीचिदाकरायमुनाचल संस्थिता ॥१॥
जययमुनाचलविहारणी ॥ शामसुंदरेसीतांवरधारिणी ॥ दीनदयाळेसंकटहारिणी ॥ साष्टांगनमनतुजाअसो ॥२॥
स्कंदवक्तापुराणाचा ॥ ऋषीसीबोलेमधुरवाचा ॥ कपिलमुनीराजायोगियाचा ॥ जोसिद्धांचामुगुटमणी ॥३॥
तोभोगावतीच्याउत्तरतटीं ॥ आदिदेवाचीव्हावयातुष्टी ॥ करितांझालायाग इष्टी ॥ संभारसर्वमेळविनी ॥४॥
कार्तिकमासशुक्लपंचमी दिनी ॥ भृगुवारनक्षत्ररोहिणी ॥ यज्ञारंभकपिलमुनी ॥ करिताझालातेधवां ॥५॥
यज्ञार्थपाचारिलें जेमुनी ॥ तेसपारवाराअले ॥ आश्रमसोडोनी ॥ वसिष्ठात्रीपराशरजमदग्नी ॥ भारद्वाजविश्वामित्रऋषी ॥६॥
गौतमासितदेवलाचार्य ॥ सुमंतसौरभीवाभ्रवेय ॥ नारदाकुत्सदेवश्रवाआर्य ॥ संस्कृतिपती माषतांडय ॥७॥
वाभ्रायनीइत्यादिब्रह्मानिष्ठ ॥ सत्यवादीसपरिवारतपोनिष्ठ ॥ आलेयज्ञार्थद्विजवरिष्ठ ॥ मंत्रवेत्तेसर्वही ॥८॥
यज्ञसंभारसंपादन ॥ खाणॊनीकुंडकेलीनिर्माण ॥ मंडपचौसष्टहस्तप्रमाण ॥ षोडशस्तभयसंयुक्त ॥९॥
उचीसीतरीपंचहस्त ॥ पवित्रकाष्ठानेंनिर्मित ॥ ध्वजपताकशोभिवंत ॥ सर्वहीकेलेंयथाशास्त्र ॥१०॥
चतुरस्त्रत्रिकोणभगाकृती ॥ इत्यादीजैसीशास्त्रपद्धति ॥ मंडपकुंडयंत्रादिस्थिति ॥ जैसीअसावीतैसीकेली ॥११॥
औदुंबरशमीखदिर ॥ याचेंयथाशस्त्रयज्ञापात्रें ॥ उल्लखमुसलादिसमग्र ॥ संपादिलेंयज्ञांग ॥१२॥
अध्वर्युयाज्ञवल्क्यजतत्त्वतां ॥ गौतमऋषिझालाहोता ॥ पराशरऋषिउद्गाता ॥ वसिष्ठब्रह्माझालासे ॥१३॥
प्रस्तोतागालवऋषी ॥ कपिलयजमानत्यायज्ञासी ॥ अन्यऋशेहेगणऋत्वीजकर्मासी ॥ करितेझालेतेकाळीं ॥१४॥
ऐशामनोरमयज्ञाप्रती ॥ देवयेऊनीभागघेती ॥ पुरोडाशब्रह्माचरुसमिधानिश्चिती ॥ अश्वत्थादिवृक्षाच्या ॥१५॥
धृमाकुलझालासर्वप्रदेश ॥ संस्कारकरुनीआज्यास ॥ तिलव्रीहीयवादिहविर्द्रव्यास ॥ संस्कारकेलेसर्वही ॥१६॥
मंत्रोच्चारकरुनीब्राह्मण ॥ अग्नींतघालितीअवदान ॥ यज्ञमहोत्सवद्वादशदीन ॥ कपिलमुनीचाहोतसे ॥१७॥
देवसंतुष्टीकारकयज्ञाझाला ॥ मगदरुनीअवभृतस्नानाला ॥ बहुदक्षणादेऊनितोपविला ॥ ऋत्विजमुनीगणकपिलानें ॥१८॥
अन्यहीजोड्विजोत्तमजन ॥ दीन अनाथत्यालागुन ॥ घनभोजनसन्मानदेऊन ॥ तोपविलेंसर्वांसी ॥१९॥
ऐसाउत्तमयज्ञकरुन ॥ खणोनीजलकेलेंनिर्माण ॥ पवित्रगंगाजलासमान ॥ कपिलधारानामठिविलें ॥२०॥
त्यातीर्थांकरीजोस्नानपान ॥ तोनरनिष्पापहोऊन ॥ शुद्धहोयपुण्यवान ॥ ब्रह्मालोकाप्रतीजाय ॥२१॥
जोराविवारींसुर्योदयींस्नान ॥ करुनिकापिलेश्वराचेंपुजन ॥ यथाशक्तिजपकरीलजाण ॥ वचस्पतिसमानहोईलतो ॥२२॥
जेव्हांआमावाश्यासोमवती ॥ कालयोगेंयेईलनिश्चिती ॥ तेव्हांस्नानदानजेमानवकरिती ॥ तेधन्यहोतीयालोंकीं ॥२३॥
तेब्रह्माप्राप्तीसीयोग्यहोतीं ॥ ऐसीयातीर्थाकीर्ति ॥ यासमानाअन्यनसती ॥\ तीर्थेंब्रह्मांडभुवनांत ॥२४॥
नित्ययातीथींस्नान ॥ करितांनिष्पापहोतीजन ॥ ऐसेंकपिलधरिचेंमहिमान ॥ वर्णिलेंभ्यांतुम्हांप्रती ॥२५॥
यासीजोनरकरीलश्रवण ॥ त्यासीजगदंबासुप्रसन्न ॥ होऊनिदेईलवरदान ॥ मनोरथपूर्णकरील ॥२६॥
ऐसेंहेंमाझेंवचन ॥ कधींअन्यथानोव्हेंजाण ॥ ऐसाहाकपिलयज्ञ ॥ तुम्हांप्रतीवर्णिला ॥२७॥
तैसेंचधारासुराचेंआध्यान ॥ जोनरयासीकरीलश्रवण ॥ तोनिष्पापहोयजाण ॥ यांतसंदेहनसेची ॥२८॥
आणीकएकसांगतोंतुम्हाप्रत ॥ भैरवसर्वलोकराक्षणार्थ ॥ शिवालयाचेईशान्येकोणीस्थित ॥ त्याचेम्पुजनकरावें ॥२९॥
रविवारींभौमवारींभौरवाप्रती ॥ तिलतैलानेंअभिषेककरिती ॥ माषान्ननैवेद्यसमर्पिती ॥ भैरवकुंडीस्नानकरोनी ॥३०॥
सर्वहीविघ्नाचेम्भय ॥ त्यासीकधींहीनहोय ॥ यालोकींयेथेष्टसुखभोगहोय ॥ अंतीजायेशिवपदा ॥३१॥
पाहतांभैरवाचेसदन ॥ व्याघ्रसर्पचोरनृपभयजाण ॥ तैसेंचशत्रुचेंभयदारुण ॥ कधींहीनहोयतयासी ॥३२॥
रोगव्याधिकधींनहोती ॥ दृढराहेशरीरस्थिति ॥ स्कंदम्हणेम्यातुम्हांप्रती ॥ तीर्थमहिमावर्णिला ॥३३॥
ऐसींबहुततीर्थेयमुनापर्वतीं ॥ शुभदायकसर्वहीअसतीं ॥ साकल्यवर्णिलीं तुखांप्रती ॥ हींयथाविधीकरावीं ॥३४॥
भक्तिभावेंतीर्थेंकरिती ॥ त्यांचीहोयपापनिवृत्ति ॥ अंतीसायुज्यापावती ॥ ऐसेंमहात्म्यतीर्थाचें ॥३५॥
यापरीकथिलेंउत्तमोत्तम ॥ जगदंबेचेंमहात्म्यमनोरम ॥ हेंभभक्तिनेश्रवणपठणपरम ॥ करितांमनोरथपूर्णहोती ॥३६॥
ऐसेंतुळजामहात्म्यपूर्ण ॥ छत्तीसाअध्यायस्कंदपुराण ॥ स्कंदानेंऋषीसीकेलेंकथन ॥ तेंचीवरिष्ठासीशिवेंकथियलें ॥३७॥
बहुऋषीसमुदायमिळोन ॥ स्कंदाचेंदर्शनघेऊन ॥ त्यासीनमुनीकेलाप्रश्न ॥ धर्मनिर्णयकळावया ॥३८॥
स्कंदानेंवेदार्थशोधुन ॥ धर्मनिर्णयकेलाकथन ॥ त्याचेंचामस्कंदपुराण ॥ अतिविस्तारपूवक ॥३९॥
त्याचेअसतीअनेकखंड ॥ काशींखंडगोकर्णखंड ॥\ हिमाद्रिखंडविंध्यांद्रिखंड ॥ सह्याद्रीखंद इत्यादी ॥४०॥
त्यापुराणांतीलसह्याद्रीखंड ॥ त्याम्तमहात्म्येंअसतीउदंड ॥ त्यांतछत्तीसअध्याय अखंड ॥ श्रीतुळजादेवींचेंमहात्म्य ॥४१॥
होंसेस्कृतव्यासोक्त ॥ अर्थत्याचारचिलाप्राकृत ॥ ओवींछंदसुलभसर्वीर्थ ॥ सर्वलोकांसीकळावया ॥४२॥
म्हणेपाडिरंगजनार्दन ॥ जगदंबाकॄपेनेंग्रंथपूर्ण ॥ झालात्याचेंअनुक्रमकथन ॥ येथुनीआतांऐकावें ॥४३॥
जीदेवीआदित्यांतर्गत ॥ हृदयीकमळींविराजित ॥ यमुनापर्वतींवासकरीत ॥ नमनतिजलासाष्टांगें ॥४४॥
श्रीतुळजादेवीचेंचरित्र ॥ स्कंदपुराणोक्तपवित्र ॥ छत्तीसाध्यायविचित्र ॥ शंकरवरिष्ठसंवादजो ॥४५॥
प्रथमाध्यायींमगलाचरण ॥ गणेशादिदेवतांवंदन ॥ षडाननासीऋषीचाप्रश्न ॥ शंकरासीवरिष्ठेप्रश्नकेला ॥४६॥
त्वरितादेवीयमुनाचलीं ॥ किमर्थयेऊनीराहिली ॥ तेंसांगावयाचंद्रमौळी ॥ पतिव्रताचरित्रवणिलें ॥४७॥
कर्दमब्राह्मणाचीसती ॥ पतिवियोगेंमेरूपर्वतीं ॥ तपकरीत असतां अनुभुती ॥ कुक्करदानविघ्नकेलें ॥४८॥
पुढेंद्वितीयाध्यायींजाण ॥ अनुभूतीनेकेलेंस्मरण ॥ तिचेंकरावयारक्षण ॥ त्वरितादेवीप्रगटझाली ॥४९॥
तृतीयाध्यायींदेवीनेंतेथें ॥ युद्धकरोनीमारिलेंदानवातें ॥ अनूभुतीदेऊनीवरदानातें ॥ यमुनाचलासीपातली ॥५०॥
श्रीरामासद्यावयासदर्शन ॥ परिवारसवेंघेऊन ॥ भैरवासीपुढेंपाठवून ॥ मागाहुनीआलीजगदंबा ॥५१॥
पुढेंचतुर्थाद्यायींकथन ॥ रामासदर्शनदेण्याचेंकारण ॥ परशुरामासीवदान ॥ रेणुकेनोंदिधलेंहोतें ॥५२॥
संक्षेपेंभार्गवरामचरित्र ॥ तैसेंचभविष्यश्रीरामचरित्र ॥ अवतारद्वयकथापवित्र ॥ चतुर्थाध्यायींवर्णिली ॥५३॥
रामलक्ष्मणयमुनापार्वतीं ॥ येताचभेटलीभगवती ॥ श्रीरामेपुजलीकरुनिस्तुति ॥ हेंचवर्णनपांचव्यांत ॥५४॥
षष्ठाध्यायींसहस्त्रनाम ॥ श्रीतुळजेचेंअतिउत्तम ॥ सगुणनिर्गुणरुपपरम ॥ नामार्थापाहाताकळतसे ॥५५॥
सातवेअध्यायींनिरुपण ॥ अंधेनेंरत्नदीपघेऊन ॥ श्रीरामलक्ष्मणासओवाळून ॥ आशीर्वाददिधला ॥५६॥
पुढें जेंकर्तव्यरामासी ॥ तेभाविष्यकथिलेंसर्वत्यासी ॥ अनेकवरदेऊनीवेगेंसी ॥ लंकेसीजावया ॥ आज्ञापिलें ॥५७॥
लिंगस्थापुनरामगेले ॥ देवीनेंराहवयास्थळपाहिलें ॥ इतुकेंनिरुपणझालें ॥ सातवेंअध्यायामाझारीं ॥५८॥
आठवेअध्यायींयमुनापर्वत ॥ त्याचीशोभावर्णिलीबहुत ॥ ब्रह्मांडांतमुख्यतेंसमस्त ॥ दर्शनासीआलेअंबेच्या ॥५९॥
ब्रह्मादेवपरिवारासहयेऊन ॥ अंबेचासत्कारकेलापूर्ण ॥ देवींनेकुशलवर्तमान ॥ ब्रह्मायासीविचारलें ॥६०॥
देवीसराहावयास उत्तमस्थान ॥ निर्माणकरावयाचतुरानन ॥ विश्वकर्म्यासीआज्ञापीजाण ॥ इतुकेंकथन आठव्यांत ॥६१॥
नवमाध्यायहेंचीकथन ॥ विश्वकर्भ्यानोंविर्धाआज्ञेंकरुन ॥ देवीचेंउत्तमस्थाननिर्मून ॥ इतरदेवांचीस्थानेंनिर्मिली ॥६२॥
ब्रह्मायानेंतेव्हांत्वरित ॥ ब्रह्मांडातीलाऐश्वर्यसमस्त ॥ तीर्थसर्वहीपवित्र बहुत ॥ देवीप्रीत्यर्थाआणविली ॥६३॥
दशमाध्यायीहेंचीकथन ॥ त्र्यैलोक्यांतीलतीर्थेंसंपूर्ण ॥ एकत्रराहिलीतेकल्लोळजाण ॥ त्रिवेणीतेंगायमुख ॥६४॥
सुधाकुंडतेससप्तसागर ॥ कल्लोळतीर्थाचामहिमाअपार ॥ वर्णिलाअसेसविस्तर ॥ हेंचनिरूपणदशमांत ॥६५॥
एकादशाध्यायांत ॥ त्रिवेणीतेंचीधारातीर्थ ॥ तेंचीगायमुखत्याचाअत्यंत ॥ महिमावर्णनकेलाअसे ॥६६॥
सुधाकुंडाचावर्णिलामहिमा ॥ तैसाचब्रह्मकुपमहिमा ॥ विष्णुतीर्थाचामहिमा ॥ वर्णिलाअकराव्याअध्यायींसपूंर्ण ॥६७॥
बाराव्याअध्यायीं विष्णुतीर्थ ॥ तेथेंगौतमब्रह्मणविष्णुभक्त ॥ त्यासीवरदेऊनीविष्णुत्वरित ॥ तेथेंचगुप्तराहिला ॥६८॥
औदुंबरतीर्थाचेंवर्णन ॥ कालभैरवाचेंपुजन ॥ यादोहीचेंफलसांगुनाध्यायसंपलाबारावा ॥६९॥
आतांतेराव्याआध्यायांत ॥ वासुकीनेंनिर्मूनतीर्थ ॥ तपकेलेंतयाप्रत ॥ बहुवरदिधलेअंबेनें ॥७०॥
मातंगीदेवीचेंमहात्मकींचित ॥ वर्णनझालेंतेराव्यांत ॥ मांतगीचरित्रचवदाव्यांत ॥ सविस्तरवर्णिलं ॥७१॥
मातंगासुरेंदेवासीगाजिलें ॥ तेव्हांदेवशरणाआले ॥ जगदंबेचेंस्तवनकेलें ॥ अभयदिधलेंअंबेनें ॥७२॥
पुढेंपंधराव्याअध्यायांत ॥ मातंगराक्षसाचेंसैन्यबहुत ॥ देवीनेंसंग्रामकरुनअदभुत ॥ असंख्यसैन्यमारिलें ॥७३॥
पुढेंसोळावेंअध्यायींकथन ॥ अंबेनेआपल्याशरीरांतुन ॥ शक्तिएकनिर्माणकरुन ॥ युद्धकरविलेंतिजहातीं ॥७४॥
आपणारहीलीकौतुकपाहत ॥ शक्तिनेंपरक्रमकरोनीअदभुत ॥ मातंगासुरमारिलारणांत ॥ संतोषकेलादेवांसी ॥७५॥
जगदंबेनेतेवेळे ॥ शक्तिसवरबहुतदिधले ॥ मातंगीम्हणोनीनामठेविलें ॥ षोडशाध्यायींकथाऐसी ॥७६॥
पापनाशीतीर्थनुसिंहतीर्थ ॥ तिसरेंतेंमुद्गळतीर्थ ॥ सप्तदशाध्यायींवर्णिलें निश्चित ॥ फलहीबहुतवर्णिलें ॥७७॥
अष्टादशाध्यायींआश्विनमासी ॥ नवरात्रपुजावेंअंबिकेसी ॥ कुमारीपुजनजपहोमासी ॥ यथाशास्त्रवर्णिलें ॥७८॥
एकोणविसावेअध्यायींकथन ॥ विजयादशमीस देवीमिरवून ॥ पांचदिननिद्रानंतर जाण ॥ जागृतकरोनीपुजावें ॥७९॥
पौर्णिमाकृष्णाष्टमीचतुर्दशी ॥ आश्विनेअकार्तिकद्विमासतिथींसी ॥ मार्गशीषेअष्टमीसी ॥ जगदंबेचेंपुजन ॥८०॥
चंपाषष्ठीमलारिपुजासांगन ॥ एकोणविसावासंपलाजाण ॥ पुढेंविसव्यांतपुजाविधान ॥ पौषमासादिवर्णिलं ॥८१॥
सप्तमीपासोनपौर्णिमेपर्यंत ॥ पूजनदर्शनाचेंफळबहुत ॥ माघसप्तमीविष्णुतीर्थात ॥ सुर्यपुजनवर्णिलें ॥८२॥
माघकृष्णचतुर्दशीशिवार्चन ॥ फाल्गुनकृष्णाष्टमीदेवीपुजन ॥ चैत्रमासनवरात्रअंबापुजन ॥ श्रीरामपुजननवमीसी ॥८३॥
चैत्रकृष्णाष्टमीभैरवपुजन ॥ वैशाखशुद्धतृतीयारेणुकापुजन ॥ परशुरामपुजावर्णुन ॥ विस्तावाअध्यायसंपला ॥८४॥
एकविसावेअध्यायींकथन ॥ वैशाखशुद्धचर्तुदशीजाण ॥ करावेंनरहरीचेंपुजन ॥ तैसेम्चपुजनअंबेचे ॥८५॥
ज्येष्ठशुद्धपौर्णिमेसी ॥ भावेपुजावेंमातंगीसी ॥ आषाढकृष्णनवमीसी ॥ दत्तात्रयासीपुजावें ॥८६॥
श्रावणशुद्धपंचमीसी ॥ वासुकीतीर्थीपुजावें नागासी ॥ श्रावणचतुर्दशीपौर्णिमेसी ॥ जगदंबेसीपुजावें ॥८७॥
भाद्रपदशुद्धचतुर्थीसी ॥ दत्तासमीपगणेशासी ॥ पूजावेंभाद्रपदपौर्णिमेसी ॥ जगदंबेसीपुजावें ॥८८॥
पुढेंबावीसावेअध्यायींकथन ॥ देवीयात्रेचेंविधान ॥ देवीपुजनब्राह्मणभोजन ॥ सुवासिनीभोजन इत्यादि ॥८९॥
अंतर्गृहयाचाविधान ॥ देवीमहात्म्यश्रवणपठण ॥ यात्राफलबहुवर्णन ॥ बाविसाव्यांतसांगितलें ॥९०॥
तेविसावेअध्यायींजाण ॥ युधिष्ठिरलोमशकसंवदकथन ॥ बिल्वराजाचेंआख्यान ॥ महिमानागतीर्थाचा ॥९१॥
नागतीर्थनरसिंहतीर्थ ॥ सर्वतीर्थमैराळतीर्थ ॥ भैरवपांडवलघुतीर्थ ॥ वर्णिलेंअसती ॥९२॥
भवानीभैरवरामेश्वरा ॥ नागेश्वरनागतीर्थसुंदर ॥ याचामहिमाबहुविस्तर ॥ तेविसाव्यांतवर्णिला ॥९३॥
चोविसाव्यांतरेणुकाभुवन ॥ सीतेंनेंदेवीसीकेलेंनमन ॥ देवीनेसीतेसीवरदेऊन ॥ वस्त्र अलंकारदिधले ॥९४॥
सिद्धेश्वरसोमशर्माआख्यान ॥ आर्यादेवीनेंइंद्रासवरदान ॥ दिधलेंतेंवर्णनकरुन ॥ चोविसावासंपला ॥९५॥
पंचविससविसाध्यायदोन ॥ मार्कंडेयतपोवर्णन ॥ देवीनेंदिधलेंवरदान ॥ हेंचवर्णनझालेंअसे ॥९६॥
सत्ताविसाव्यांतरामेश्वर ॥ भोगावतीतटीसुंदर ॥ आणीधृतराष्ट्रनागानेंनागेश्वर ॥ स्थापिलेंतेंवर्णिलें ॥९७॥
याअध्यायसधरुन ॥ धारासुराचेंआध्यान ॥ तेहतीसाध्यायपर्यतपूर्ण ॥ वर्णिलेंअसोविस्तारें ॥९८॥
पुढेंभोगावतीउद्धववर्णन ॥ कपालेश्वराचेंवर्णन ॥ लक्ष्मीतीर्थऋणमोचन ॥ पापविमोचनतीर्थवर्णिलें ॥९९॥
नृसिंहतीर्थसुर्यकुंडतीर्थ ॥ सिद्धेश्वरनागेश्वरधारातीर्थ ॥ चक्रतीर्थकपिलतीर्थ ॥ चौतीसपस्तीसाव्यांतवर्णिलीहीं ॥१००॥
छत्तिसाव्यांतकपिलयज्ञवर्णन ॥ तैसेचभैरवाचेंवर्णन ॥ ऐसेंछत्तीसाध्यायसंपुर्ण ॥ कथनकेलेंस्कंदानें ॥१०१॥
मुळछत्तीसाध्यायसंस्कृत ॥ त्यावरीरचिलाप्राकृतग्रथं ॥ छत्तीससध्यायमुळार्थ ॥ मराठीभाषेंतवर्णिला ॥२॥
जगदंबेचेप्रेरणेंकरुण ॥ अर्थसुचलातोलिहिलापुर्ण ॥ न्युनाधिकतेक्षमा करोन ॥ अंबाकृपावलोकनकरोसदा ॥३॥
ग्रंथाचेआदिअंतीं ॥ वंदनकरावेंवेंद्याप्रती ॥ ग्रंथपूर्णझालानिश्चितीं ॥ यास्तववंदनकरितोंमी ॥४॥
स्वनामगोत्राचाउच्चार ॥ करुनीकरावानमस्कार ॥ ऐसेंशास्त्राणिवृद्धाचार ॥ यास्तवपूर्वजवर्णितों ॥५॥
श्रीतुळजाक्षेत्राचेवायव्यकोणासी ॥ दहाक्रोशांतरज्याग्रामासी ॥ पांगरीनाम असेत्यासी ॥ ब्राह्मणवस्तीबहुजेथें ॥६॥
तेथेंमुद्गलगोत्रोत्पन्न ॥ शाकलशाखाध्यायींब्राह्मण ॥ वृत्तीवानदेशपंदितम्हणुन ॥ देवाजीपंतनामज्यांचें ॥७॥
त्याचापुत्राअवजीपंत ॥ त्याचाखंडोपंतसुत ॥ त्याचापुत्रजनार्दनपंत ॥ शास्त्रज्ञाअणिसत्पुरुष ॥८॥
काव्यनाटकालंकार ॥ न्यायशास्त्रमाजींचतुर ॥ सर्वदावेदांताविचार ॥ उदासीनताप्रपंचावरी ॥९॥
आराध्यदैवतशंकर ॥ पंचाक्षरीजपतत्पर ॥ सर्वदाशिवनामउच्चार ॥ स्तोत्रपाठकरीतसे ॥१०॥
तोजनार्दनमाझापिता ॥ हरीबाईमाझीमाता ॥ जीसर्वदाशरणपंढरीनाथा ॥ नामनिष्ठाजपतसे ॥११॥
हेउभयतामातापिता ॥ यासीमीपांडुरंगशर्माआतां ॥ चरणीठेवुनियांमाथा ॥ नमस्कारकरितोंसाष्टांगे ॥१२॥
शास्त्राचार्यपुराणकर्त्यासी ॥ ब्रह्माविद्यासंप्रदायकर्त्यासी ॥ आचार्यगुरुपरंपरेसी ॥ साष्टांगनमनसर्वदा ॥१३॥
जगदंबाजगज्जननी ॥ श्रीतुळजापुरनिवासिनी ॥ वाकपुष्पेंअर्चिलीलींभवानी ॥ प्रसन्नअसोसर्वदा ॥१४॥
शरणांगतजेदीनपीडित ॥ त्यासीरक्षिसीसदाजागृत ॥ दयाळुमाउलीतुजप्रत ॥ सांष्टांगनमस्कारहामाझा ॥१५॥
श्रोतेहोतुमचाउपकार ॥ तुम्हीमजआज्ञापिलेंबहुवार ॥ म्हणोनीप्रवर्तलोसाचार ॥ सेवाघडलीअंबेची ॥१६॥
क्षेत्रस्थाअचार्यजयरायपंडित ॥ धर्मनिष्ठाविष्णुभक्त ॥ त्याच्याआज्ञेनेंहाग्रंथ ॥ केलाआहेयथामती ॥१७॥
शकेअठराशेंवीस ॥ विलंबलामसंवत्सरास ॥ माघशुद्धप्रतिपेदस ॥ ग्रंथपूर्णतेसपावला ॥१८॥
श्रीतुलजापुरक्षेत्रांत ॥ हाग्रंथझालाउद्धुत ॥ क्षेत्रस्थसर्वकृपाकरोत ॥ पांडुरंगजनार्दनावरी ॥११९॥
इतिश्रीस्कंदपुराणेसह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्येशंकरवरिष्ठसंवादे ॥ षटत्रिशोध्याय ॥३६॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभवंतु ॥ समाप्तोयग्रंथ ॥ श्री ॥१॥११॥१८२०॥
एकंदरग्रंथसंख्या दोनहजारसहाशेंपांच ॥२६०५॥ श्रीजगदंबार्पणस्तु ॥ शुभंभवतु ॥