Android app on Google Play

 

अध्याय ८

 

श्रीगणेशायनमः ॥ जयजगन्मातेभवानी ॥ यमुनागिरीविहारिणी ॥ जयकल्मपनाशिनी ॥ वेदगुह्यांनमोतुज ॥१॥

यमुनाचलाचेंमहिमान ॥ शंकरवर्णितस्वयें आपण ॥ म्हणेवरिष्टाकरीश्रवण ॥ एकाग्रचित्तकरोनियां ॥२॥

ज्यारम्यपर्वतावरी ॥ देवतामापरमेश्वरी ॥ राहिलीसंतुष्टसहपरिवारी ॥ धन्यतोगिरीअतिश्रेष्ठ ॥३॥

ज्याघरींराहेनृपवर ॥ तेंगृहशोभेअतिसुंदर ॥ तेथेंचसंपत्तीसंभार ॥ सेवकपरिवारतिष्ठती ॥४॥

श्रीतुळजदेवींचेघर ॥ तेंहोययमुनागिरीवर ॥ सुवर्णवैडूर्यरत्‍नांचेंशिखर ॥ अनेकज्यासीशोभती ॥५॥

इंद्रनीळमहानीळ ॥ हिरेपद्यरागसुढाळ ॥ अनेकरत्‍नमयसोज्वळ ॥ अनेकशिखरेंशोभती ॥६॥

अनेकधातुश्वेतपीत ॥ कृष्णवर्णहरिताअरक्त ॥ निर्झरौदकाचेश्रवत ॥ ठायींठायींअतिरम्य ॥७॥

उदकश्रावेंवेळोवेळां ॥ शिथिलहोऊनीगंडशीळा ॥ ढासळतांचतयेवेळा ॥ धडधडशब्दहोतसे ॥८॥

जैसावनगजासिंदूररंजित ॥ दानोदकगंडस्थळीस्त्रवत ॥ तैसाशोभहापर्वत ॥ चित्रविचित्रधातूनें ॥९॥

मेघज्यावरीस्थिरावती ॥ शीतळजळवृष्टीकरिती ॥ जैसाउपास्यमाननृपती ॥ प्रधानसेवकेंशोभला ॥१०॥

सिंहव्याघ्रतरक्षरुक्षक ॥ वानरगजमहिषपवृक ॥ मृगवराहशशउल्लक ॥ व्यालबिडालकगोधादि ॥११॥

अनेकश्वापदेंपर्वतींफिरती ॥ जेवींनृपाचसैनिक असती ॥ पक्षीसमुदाय ॥ शब्दकरिती ॥ बंदीजनज्यापरी ॥१२॥

शुकपारावतमयुर ॥ हंसकोकीळमेनकाथोर ॥ कलकल शब्दकरितीमधुर ॥ पक्षीअनेकाजातीचें ॥१३॥

इकडूनतिकडेधांवती ॥ वृक्षशाखेवरीबैसती ॥ गोड फळांतेचाखिती ॥ उडोनिजातीस्वइच्छा ॥१४॥

ऐसापर्वतशोभायमान ॥ जेंवीकांधनिकधनसंपन्न ॥ अनेकवृक्षउंचगगन ॥ स्पर्शकरूंपाहती ॥१५॥

पत्रपुष्पफलसंपन्न ॥ शीतळछायादाटघन ॥ जेथेंनरिघेसुर्यकिरण ॥ निदाघजेंवीचंद्राबिंबीं ॥१६॥

गुच्छस्तबकनवपल्लवयुक्त ॥ नम्रपादपदिसती बहुत ॥ विद्वानधार्मिकगर्वरहित ॥ शोभतीजैसेयालोंकीं ॥१७॥

अशोकफणस आम्रवृक्ष ॥ कोवीदारकदंबवटपक्ष ॥ अक्षोठदारूबदरीवृक्ष ॥ खर्जुरहिंगुलकपित्थ ॥१८॥

बिल्वचंपकनागचंपक ॥ पाटलीअसनीवृक्षातिलक ॥ अगस्तीवृक्षपिचूमंडकुरबक ॥ अश्वत्थाअमलकीतिंत्रिणी ॥१९॥

निंबकुंभी अर्जुबाहुक ॥ शालतालतमालबिभीतक ॥ पलाशमधुआम्रातक ॥ औदुंबराअदिकरोनी ॥२०॥

शमीअस्मातकखदीर ॥ इत्यादिवृक्षेंशोभोगिरीवर ॥ जैसाऐश्वर्यसंपन्ननर ॥ बहुशोभेयालोकीं ॥२१॥

द्राक्षमालतीकारवीर ॥ जाईजुईशतपत्रतगर ॥ गोकर्णगुलाबनागकेशर ॥ पुष्पभारेंगिरीशोभ ॥२२॥

जैसाधनाढ्यविलासीनर ॥ तरुणाआरोग्यरुपसुंदर ॥ अनुकुल असतीविषयसंभार ॥ शोभेतैसागिरी शोभे ॥२३॥

सर्वप्रकारेंसुरेव्यपर्वत ॥ तापसीतयातेंआचिरत ॥ मुनीसुद्धबैसलेध्यानस्थ ॥ उत्तम स्थळपाहोनी ॥२४॥

उत्तमछायेसीबैसोन ॥ गंधर्वकिन्नरकरितीगायन ॥ अप्सराकरितीनर्तन ॥ ताल धरोनीवाद्याचा ॥२५॥

ठांईठाईशोभाअदभुत ॥ पाहूनधांवेयेथुनीतेथ ॥ जैसासुसेव्यमेरूपर्वत ॥ यमुनाचलहीतैसाची ॥२६॥

ठायींठायींसरोवर ॥ नदनदीवापीकूपअपार ॥ निर्मळशीतळगोडनीर ॥ पर्वतीं बहुशोभती ॥२७॥

ऐशाउत्तमपर्वतावरी ॥ त्वरीतादेवीसर्वेश्वरी ॥ राहिलीआहेभुवसुंदरी ॥ स्वर्गस्थदेवासीकळोंआले ॥२८॥

आपुलेंपरिवारासहित ॥ धांवताअलेदेवसमस्त ॥ मनींहोऊनीउत्कंठीत ॥ दर्शनलागींअंबेच्या ॥२९॥

अप्सरागंधर्वासहित ॥ लोकपालयेतीधावत ॥ इंद्रवन्हीयमनैऋत्य ॥ वरूणसमीरसोमरुद्र ॥३०॥

अश्विनीकुमर अष्टवसगुण ॥ रुद्रादित्यापितृगण ॥ विश्वेदवसाध्यगण ॥ दर्शनाआलेंअंबेच्या ॥३१॥

सनकादिऋषीगण ॥ शेषादिकपन्नगगन ॥ ब्राम्हींआदिमातृगण ॥ दर्शनायेतीअंबेच्या ॥३२॥

अनिमादिमहासिद्धि ॥ शंखपद्मादिनवनिधी ॥ कृतत्रेताद्वापारादि ॥ युगचौकडीकलीसहित ॥३३॥

प्रभावादिसंवत्सर ॥ वसंतादिऋतुपरिवार ॥ चैत्रादिमाससत्वर ॥ दर्शनपातलेअंबेच्या ॥३४॥

पक्षतिथीवारनक्षत्र ॥ घटिकामुहूर्ताअणिप्रहर ॥ दिवसनिशीनिमिषादिसमग्र ॥ दर्शनापातलेअंबेच्या ॥३५॥

कालकल्पनासमस्त ॥ तदाभिमानीजेंजेंदैवत ॥ होऊनियांमूर्तीमंत ॥ दर्शनापातलेअंबेच्या ॥३६॥

नारदादिदेवऋषी ॥ भृगुआदिसर्वमहर्षि ॥ घेऊनी शिष्यसमुदायासी ॥ दर्शनापतले अंबेच्या ॥३७॥

महापुराणौपपुराण ॥ स्मृतीइतिहाससंपुर्ण ॥ सर्वहीसस्वरुपधरुण ॥ दर्शनापातले अंबेच्या ॥३८॥

वैशेषिककाणादकेवळा ॥ गोतप्रणेतन्यायप्रांजळ ॥ कापिलसांख्ययोगपातजंल ॥ मीमांसाअणिवेदात ॥३९॥

मुख्यशास्त्राचेंषटक ॥ इतरहीशास्त्रेंअनेक ॥ स्वरुपधरोनीनेटक ॥ दर्शनापातलेअंबेच्या ॥४०॥

सर्वश्रुतींचेसमुदाय ॥ सर्वांहुनीअधिकहोय ॥ पुराणांचे समुदाय ॥ दर्शनपातलेअंबेच्या ॥४१॥

अंबेचीसेवाकरावीम्हणुनी ॥ सर्वंहीस्वेच्छारूपेंधरोनी ॥ यमुनाचळींआदिभवानी ॥ तेथेंसर्वहीपातले ॥४२॥

ऐकोनीसंतोषलावरीष्टमुनी ॥ पुन्हांपुसेशंकरालागुनी ॥ यमुनाचळींवस्तीकरुनी ॥ राहिलीअसतांजगदंबा ॥४३॥

कोणकोणदेवयेथेंराहिले ॥ कोणकोणऋषीस्थिरावले ॥ कोणपन्नगस्थितीपावले ॥ देवस्त्रियाकितीअसती ॥४४॥

कोणकोणानामचीतीर्थेंसकळ ॥ स्नानादिकेलियाकायफळ ॥ हेंमींऐकुंइच्छितोंकेवळ ॥ तरीकृपाकरुनीसांगावें ॥४५॥

आतांयेथेंस्वामीकार्तिक ॥ म्हणेऐकातुम्हीमुनीसकळीके ॥ यापरीवरिष्टमुनीनायक ॥ पुसताझालाशिवासी ॥ ४६॥

तंवकर्पुरध्वलपंचानन ॥ ऐकम्हणोनीबोलेवन ॥ त्वारितादेवीपर्वतींयेऊन ॥ राहिलीअसतांतेसमई ॥४७॥

कयझालेंतेव्हावृत्त ॥ कैशाआकारेंअंवाशोभत ॥ तुजसीसांगेनयथार्थ ॥ लोकानुग्रहइच्छेनें ॥४८॥

पर्वतीराहिलीजगदंबिका ॥ हेंजाणवलेंचतुर्मुखा ॥ विश्वश्रष्टास्वयेदेखा ॥ दर्शनानिघालाअंबेच्या ॥४९॥

हंसाविमानींब्रह्माशोभत ॥ सभोंवतेंदेवसमस्त ॥ सनकादिमुनीवरस्तुतीगात ॥ वेदमंत्रेंकरोनी ॥५०॥

पुढें अप्सरानृत्यकरिती ॥ किन्नरनाठ्यकलादाविती ॥ गंधर्वहाहाहूहुप्रभृती ॥ करितीगायनसुस्वर ॥५१॥

ऋणमुक्तसत्यलोकनिवासी ॥ जनकादिकजेराजऋषी ॥ ब्रह्मयासवेंयेती ॥ वेगेंसीजगदंबेसीपहावया ॥५२॥

ऐसापरिवारासगट ॥ ब्रह्मापातलादेवीनिकट ॥ सर्वासहितभावनिष्ठ ॥ नमस्कारकरीअंबेसी ॥५३॥

ब्रह्मयासर्वेंजेजेआले ॥ त्यांनींअंबेसीनमस्कारकेले ॥ हातजोडोनी उभेराहिले ॥ जगदंबेच्यासम्मुख ॥५४॥

उत्कंठाधरोनीमानसीं ॥ ब्रह्माआलादर्शनासी ॥ हेंपाहुनजगदंबात्यासी ॥ सम्मानकरिताआदरें ॥५५॥

विरंचीसीदिधलेउत्तमआसन ॥ मरीचीअंगिरादक्षादिब्राह्मण ॥ नारदसनकादिकाआसन ॥ पृथक सर्वांसी दिधलें ॥५६॥

तेव्हांआपुलालिया आसनीं ॥ सर्वबैसलेस्वस्थहोउनी ॥ कॄपाकटाक्षेंसमस्तापाहुनी ॥ ब्रह्मायासीबोलेजगदंबा ॥५७॥

विरंचीतुझेंआहेकींकुशल ॥ सनातनसत्यलोककुशळ ॥ वेदसर्वहीअसतीकुशल ॥ सर्वयज्ञकुशलासतीकीं ॥५८॥

मुनीसर्वहेक्षेमकुशल ॥ स्वर्गस्थदेवजेसकळ ॥ स्वाहाकारचेभोक्तेकेवळ ॥ कुशलसर्वहीअसतीकीं ॥५९॥

स्वःहाकारस्वधाकार ॥ कुशलासेकींवषटकार ॥ नानाविधयज्ञभूमीवर ॥ सदाचालतासतीकीं ॥६०॥

टोळधाडीविघ्नेअनके ॥ त्याचाकोणासनसेकीधींक ॥ पराभवकोणाचाकोणीएक ॥ नकरितीकींयालोकीं ॥६१॥

भौक्तिकप्राणिमात्रसकळ ॥ स्थूळभूतपंचकमेळ ॥ शब्दादितन्मात्राकेवळ ॥ क्षेमरूपासतीकीं ॥६२॥

श्रोत्रत्वकनेत्रजिव्हाघ्राण ॥ ज्ञानेंद्रियपंचकसहावेंमन ॥ एकएकाचेविषयभिन्न ॥ शब्दस्पर्शरूपरसगंध ॥६३॥

ऐसेंहेंभोग्यभोगसाधन ॥ भोक्ताचिदाभाससहितमन ॥ क्षेमकुशलहेंसपूर्ण ॥ आहेतकायतें सांग ॥६४॥

वाकवाणीपादशिश्नगुद ॥ हेकमेंद्रियपंचकवृंद ॥ वचनाअदानगनाआनंद ॥ विसर्गपांचवाव्यापारहे ॥६५॥

हेसर्वहीकुशलअसती ॥ विश्वव्यापारचालवितीं ॥ यासीकोणीजरीआडविती त्यासीशिक्षारिनमी ॥६६॥

त्वांजेस्थापिलेवर्णधर्म ॥ आणिजेकांआश्रमधर्म ॥ कल्याणकारकमार्ग परम ॥ यथास्थितचालतीकीं ॥६७॥

शमदमादिअध्यायन ॥ हेंब्राह्मणाचेंवर्तन ॥ प्रजापालनदुष्ट हनन ॥ क्षत्रियकरीतअसतीकीं ॥६८॥

कृष्यादिव्यापारवैश्यकरिती ॥ सेवाधर्मशुद्राअचरती ॥ ब्रह्माचारीकरुनीगुरुभक्ती ॥ वेदाभ्यासकरीतीकें ॥६९॥

गृहस्थकरितींपंचयजन ॥ वानप्रस्थसेवितीतपोवन ॥ संन्यासीध्यानपरायण ॥ एकांतसेवूनीअसतीकीं ॥७०॥

असेचतुर्विधमार्ग ॥ सरळचालतीकींअव्यंग ॥ चतुराननामनोभंग ॥ तुझानकरीतीकींकोणी ॥७१॥

शंकरम्हणेवरिष्ठाप्रती ॥ पूर्वोक्तप्रकारेंआदिशक्ती ॥ पुसतीझालीकुशलस्थिती ॥ चतुराननासीतेधवांज ॥७२॥

ऐकोनजगदंबेचाप्रश्न ॥ संतोषलाकमलासन ॥ विश्वजननीसीप्रतिवचन ॥ सर्वांसन्निधदेतसे ॥७३॥

ब्रह्माम्हणेजगदंबिके ॥ सदयहृदयतुझेंनिकें ॥ विश्वजननीविश्वपाळके ॥ चिंतासर्वाचींतूवाहसी ॥७४॥

सर्वांचेंअसावेंकल्याण ॥ हेंचिअखंडचिंतीसीपुर्ण ॥ सत्यसंकल्पातुझाजाण ॥ अन्यथाकैसाहोईल ॥७५॥

तूंपाळीसीजयासी ॥ दुःखदरिद्रकैचेंत्यासी ॥ विघ्नोत्पातभयेंकैसीं ॥ पीडाकरतीलत्यालागीं ॥७६॥

याकाळींराक्षसउन्मत्त ॥ लोकांसीषीडितीअत्यंत ॥ त्याचाकरावयाघात ॥ रामासीवरत्वांदिधला ॥७७॥

तोरामलंकेससजाउन ॥ राक्षसांचेंकरीलहनन ॥ संग्रामींरावणासवधुन ॥ राज्यदेइलविभीषणा ॥७८॥

तूंतरीसर्वाचेंमुळ ॥ तुजपासावाआम्हींसकळ ॥ आम्हासीरक्षावयाकेवळ ॥ अनंतरूपेंधरिसीतूं ॥७९॥

अनुभूतीचेंसकुटनिरसून ॥ श्रीरामासीद्यावयादर्शन ॥ यापर्वतावरीतूंयेऊन ॥ राहिलीअससीजगंदबें ॥८०॥

येथेंतूंराहिलीजाण ॥ तरीमीदेवासहितराहिन ॥ जिकडेसूर्यतिकडेकिरण ॥ राहतअसतीनिश्चये ॥८१॥

गंगादिकर्वसरिता ॥ सनकादिमुनीआणिदेवता ॥ माझे आज्ञेनेंराहतीलतत्वतां ॥ जोवरीअसताशिशिभान ॥८२॥

शंकरम्हणे ऐकवरिष्ठा ॥ पूर्णमानसविश्वस्त्रष्टा ॥ आठविताझालाशिल्पास्त्रिष्टा ॥ विश्वकर्म्यासीतेकाळी ॥८३॥

स्मरताचाविश्वकर्मायेऊन ॥ देवीसीविधीसीकरुननमन ॥ देवमुनीसनकांदिकावंदन ॥ हातजोडुनीउभाठेला ॥८४॥

ब्रह्माचेआज्ञेकरुन ॥ विश्वकर्मास्वयेंआपण ॥ प्रासादएककरीलनिर्माण ॥ जगदंबेसीराहवया ॥८५॥

तीकथापुढीलाध्यायांत ॥ श्रोतेऐकोतदेउनीचित्त ॥ पांडुरंगजनार्दनाविनवित ॥ दासषंढरीनाथाचा ॥८६॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुरजामाहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवाद ॥ अष्टमोध्यायः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥