Android app on Google Play

 

अध्याय ९

 

श्रीगणेशायनमः ॥ तुजनमोसिंहवाहिनी ॥ नमोमहिषासुरमर्दिनी ॥ शुभसुरविध्वंसिनी ॥ असुरनाशिनीतुजनमो ॥१॥

राजसतामसजेअसुर ॥ त्यासीमारसीवारंवार ॥ सात्त्विकदेवाचापरिवार ॥ तुंरक्षिसीसदाप्रेमानें ॥२॥

लीलाविग्रहधरोनी ॥ धर्मसंस्थापनाकरोनी ॥ अधार्मिकाशस्त्रेंघायेंछेदोनी ॥ पावनकरिसीत्यालागीं ॥३॥

मीमंदमतीदुर्बळ ॥ शरणाअलूंतुजकेवळ ॥ माजेहेमतीकरोनीनिर्मळ ॥ कथाबोलवीमममुखें ॥४॥

प्रतीवधाचेंकरूनिनिरसन ॥ मनावाणीसीउत्तेजन ॥ देऊनिचालवीनिरुपण ॥ तुझेकथेचेंतूमाये ॥५॥

श्रोतेव्हावेंसावधान ॥ पूर्वकथेचीकराआठवण ॥ विश्वकर्माआलाधांवोन ॥ स्मरणकरतांचविधीनें ॥६॥

म्हणेमीपातलोंर्किकर ॥ कायाआज्ञासांगासत्त्वर ॥ सांगालतेंकरीनसाचार ॥ तुमचेआज्ञेप्रमाणें ॥७॥

ऐसेंत्याचेंवचनाऐकोन ॥ ब्रह्मालोकगुरुबोलेवचन ॥ विश्वककर्म्यायेथेंस्थान ॥ उत्तमानिर्मविंदेवीसी ॥८॥

शंकराचेंआणिइंद्राचें ॥ विष्णुचेंआणिमाझेंसाचें ॥ गणेशचेंभैरवाचें ॥ योगिगणांचींस्थानेकरीं ॥९॥

कुंडाचेंआणियज्ञाचें ॥ तैसेंचस्थानमातंगीचें ॥ यथायोग्यस्थानेंसर्वाचें ॥ माझेआज्ञेनेंनिर्मावे ॥१०॥

शंकरम्हणेमुनीसत्तमा ॥ ऐसीआज्ञारितांचब्रह्मा ॥ बरेंम्हणोनिविश्वकर्मा ॥ नमस्कारकरीविधीसी ॥११॥

नमोनीतुळजभवानीसी ॥ प्रारंभकरितांझालावेगेंसी ॥ प्रथमदेवीच्या स्थानासी ॥ विधीआज्ञनेंतेकाळी ॥१२॥

जितकेबुद्धीचेंकौशल्य ॥ आहे तितकेंदाविलेंप्रांजळ ॥ जेंदेवीसीपाहतांरुचावेंस्थळ ॥ संतोषव्हावाआपणासी ॥१३॥

साठयोजनविस्तीर्ण ॥ यमुनाचलचें आहेप्रमाण ॥ तेथेंपाहुनशुभदिन ॥ आरंभकेलास्थानासी ॥१४॥

प्रथमसमानभूमीकरुन ॥ सुत्रलऊनीस्माधिलेंकोन ॥ दिशाआणिध्रुवसाधून ॥ आरंभिलाप्रासाद ॥१५॥

शुद्धजांबृनदविशाळा ॥ पूर्वादिशेसीरचिलीशाळा ॥ सहस्त्रस्तंभेअतिसोज्वळा ॥ उंचीपांचहस्ताची ॥१६॥

स्तंभेअसती सरळ ॥ रत्‍नजडितसुवर्णकेवळ ॥ त्यावरीनीलरत्‍नमयानिर्मळ ॥ सराआडवेठेविले ॥१७॥

बंखउथाळेतळखडे ॥ कड्याकडेपाठचौकडे ॥ हिरेपांचमानीकखडे ॥ जडलेशोभतीअतिशयें ॥१८॥

चंद्रकांच्याच्यादृढभिंती ॥ त्यासीस्तंभजोडिलेशोभती ॥ शिखरेंनवकुंभशोभती ॥ उपरीउपरीनवताळें ॥१९॥

सर्वांवरीकलशशोभती ॥ रत्‍नखचितत्यांचीदीप्ती ॥ गगनासीभेदूंपाहती ॥ चातुर्यविश्वकर्म्याचें ॥२०॥

अर्गळाकुलुपेंबळकट ॥ कीर्तीमुखमुखद्वाररक्षक ॥ सूर्यकांतमयसुरेख ॥ पायरियाशोभतीतयासी ॥२१॥

अष्टदिसेह्सीद्वारेंकेलीं ॥ देहलींस्तंभयुक्तशोभली ॥ कवाडेंदोफळींनिर्मिलीं ॥ रत्‍नजडविलेतयासी ॥२२॥

शिखरींरत्‍नमयपक्षीसुंदर ॥ शब्दकरतातीमधुर ॥ पारवेसाळूंक्याशुकतित्तीर ॥ हंससारसमयुरादि ॥२३॥

पुतळ्यानृत्यहावभावयुक्त ॥ नानावाद्येंवाजवित ॥ तैसेंचयोगीसन्यासीध्यानस्थ ॥ कोणीकरीतीजपादि ॥२४॥

वानरेंसिंहव्याघ्रतृक ॥ कोठेंकाढिलेंस्वस्तिक ॥ अष्टदळचर्तुळयेक ॥ स्वर्णरत्‍नमयनिर्मिलें ॥२५॥

शिखरासभोवतेंजडले ॥ मंदिरींठायींठायींभरलें ॥ शय्याआसनादिनिर्मिले ॥ मृदुलअस्तर्णेंत्यावरी ॥२६॥

सर्वापस्कारसहित ॥ वापिकादिगोडअमृत ॥ त्यांतकमळेंबिकाशित ॥ मच्छकच्छादिअसती ॥२७॥

जळअसोनीभासेंस्थळ ॥ स्थळासेनीदिसेंजवळ ॥ विश्वकर्भ्याचेंकौशल ॥ आश्चर्यकारकसर्बही ॥२८॥

सिंहासनरत्‍नखचित ॥ बत्तीससंख्यासिंव्हयुक्त ॥ मृदुअस्तर्नविराजित ॥ रत्‍नप्रभेनेंविचित्र ॥२९॥

शक्तयदिकदेवता ॥ यथास्थानीयोजिल्यासमास्ता ॥ ध्वजपाकाशोभिवंता ॥ रत्‍नजडितदंडयुक्त ॥३०॥

सर्वप्रकारेंसुंदर ॥ देवीप्रासादमनोहर ॥ विश्वकर्म्यानेंनिर्मिलाथोर ॥ इंद्रभुवनज्यावरी ॥३१॥

देवींचेअग्रभागीसुरस ॥ स्थाननिर्मिलेशंकरास ॥ शिवाचें आग्नेयकोनास ॥ स्थानविधीसीनिर्मिलें ॥३२॥

विधीच्यादक्षिणदिशेस ॥ स्थाननिर्मिलेंब्रह्मभैरवास ॥ ब्रह्मायाचेंपूर्वदिशेस ॥ स्थाननिमिंलेंविष्णुचें ॥३३॥

विष्णुच्याउतरीदिशेसी ॥ मांतगीआणियोगिनीसी ॥ इंद्रादिसर्वदेवासी ॥ स्थानेंनिमिंलीयथारुची ॥३४॥

कूर्मानेंपूर्वदिशाधरुन ॥ अष्टलोकपालांचेस्थान ॥ विश्वकर्म्यानेंसर्वनिर्मून ॥ ब्रह्मयासीनिवेदलें ॥३५॥

ब्रह्माविश्वकर्म्यानिमिंत ॥ प्रासादपाहुनसमस्त ॥ होउनियांप्रीतीयुक्त ॥ देवीसमीपपातला ॥३६॥

हातजोडेनीदेवीसी विनवीत ॥ म्हणेजगदंबेतुजप्रीत्यर्थ ॥ हाप्रासादनिर्मिलानिश्चित ॥ तरीतुंचिरकालेयेथेंराहे ॥३७॥

ब्रह्मायाचेप्रार्थनेंकरुन ॥ देवीस्वालथीबैसलीजाऊन ॥ मगदेवीपुढेईश्वराआपण ॥ स्वास्थानींजाऊनीबैसला ॥३८॥

सिद्धेश्वरयानामेंकरून ॥ प्रसिद्धपावलाअभिधान ॥ लोकावरीअनुग्रहपूर्ण ॥ करावयालवलाही ॥३९॥

ब्रह्मादिकसकळदेव ॥ आपुलालेस्थानीबैसलेसर्व ॥ विश्वकर्मास्वलाघव ॥ पाहूनितुष्टलामनांत ॥४०॥

ब्रह्मदेवाकरुननमन ॥ म्हणेजैसेंतुमचेंआज्ञावचन ॥ तैसींसेवाकेलीपूर्ण ॥ स्वस्थानासीआतांजातों ॥४१॥

ब्रह्मयासीपुसोनीसत्वर ॥ देवीसीकरुनीनमस्कार ॥ आज्ञाघेऊनीसाचार ॥ स्वर्गलोकासीतोगेला ॥४२॥

विश्वकर्मागेल्यानंतर ॥ ब्रह्माकरूनीविचार ॥ येथेंतिथेंपावनकर ॥ असावेंम्हणोनीस्मरतसे ॥४३॥

कामधेनूआणि धेणुसमस्त ॥ कल्पवृक्षादिपारीजातबहुत ॥ याचेंस्मरणब्रह्माकरित ॥ देवीप्रीत्यर्थतेकाळीं ॥४४॥

चिंतामणीचेगण ॥ स्मरतांझालाचतुरानन ॥ नंदनादिवनाचेंस्मरण ॥ देवीप्रीत्यर्थकरितसे ॥४५॥

अणिमादिसिद्धिसमस्त ॥ स्मरतांच पातल्यात्वरित ॥ जगदंबेच्यादासीबहुत ॥ करूनीठविल्याविधीनें ॥४६॥

ज्याचेंज्याचेंस्मरणकेलें ॥ तेंतेंसर्वधांवोनीआले ॥ जगदंबेच्याअकितभलें ॥ करूनठेविलेंविधीनें ॥४७॥

ऋषीपुसतेझालेस्कंदासी ॥ ब्रह्मयानेंतीर्थकैसीं ॥ आवाहिलींतेंसांगाआम्हासी ॥ ब्रह्मांडातीलसर्वही ॥४८॥

स्कंदम्हणेमुनीहो एकाग्र ॥ ऐकाकथासांगतोंसमग्र ॥ चतुराननेंपर्वतावर ॥ जेंजेंकृत्यकेलेंतें ॥४९॥

विश्वकर्म्याहातेंमंदीर ॥ देवीकरितांकरविलेंसमग्र ॥ इतरदेवासहिमनोहर ॥ स्थानेंनिर्माणकरविलीं ॥५०॥

तेंपाहून ब्रह्मादेव ॥ देवीचेंअभिषेकास्तव ॥ लोकपाळनव्हावयासर्व ॥ सर्वतीर्थेआव्हानिलीं ॥५१॥

जेथेंजेथेंअसतीतीर्थें ॥ प्राण्यासनिर्गमनाहीजेथें ॥ गिरीकंदरींअरण्यातें ॥ गुप्तस्थानींजेअसती ॥५२॥

पृथ्वीतळींद्वीपांतरीं ॥ तीर्थेंअसतीजेंसागरीं ॥ आणिकहीब्रह्मांडाभीतरीं ॥ गुप्तप्रगटजेअसती ॥५३॥

सर्वहीतीर्थासींचतुरानन ॥ आव्हानकरमित्रेंकरून ॥ तात्काळपातलीसंपूर्न ॥ तेंसंक्षेपेंकरूनीसांगेनमी ॥५४॥

आतांशंकरपुढीलीयाअध्यायी ॥ तीर्थनामनिर्देशकरीलपाही ॥ तेंऐकावयालवलाही ॥ सादरश्रोतेअसावें ॥५५॥

जगदंबाप्रसादेकरून ॥ पांडुरंगजनार्दन ॥ महाराष्ट्रभाषेतव्याख्यान ॥ ओवींप्रबंधकरील ॥५६॥

बोबडेबोलबोलबाळ ॥ ऐकोनीमारिझेप्रेमळ ॥ सज्जनाचामीलडिवाळ ॥ पाळणकरतीलप्रेमाने ॥५७॥

इति श्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ तुरजामहात्मेंनवमोध्यायः ॥९॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥