Android app on Google Play

 

अध्याय १७

 

श्रीगणेशायनमः ॥ वंदेश्रीतुरजादेवी तच्छक्तीगजवाहिनी ॥ यातुधानंरणेहत्वाययाविश्वसुरक्षितं ॥१॥

स्कंदसांगतमुनीगणासी ॥ तुरजादेवींनेंस्वशक्तीसी ॥ वरदेऊनीठेविलेंनामासी ॥ मातंगीदेवीम्हणानी ॥२॥

निरोपदिधलादेवासी ॥ जावयाआपलेस्वस्थळासी ॥ आपणमातृकासहितवेगेंसी ॥ यमुनाचळासीपातली ॥३॥

यास्तवतुरजेचशिक्ती ॥ जिसीमातंगीऐसेंम्हणती ॥ ऋषीनेंऐकोनीस्कंदाप्रती ॥ प्रश्नकेलाआदरें ॥४॥

मारुनीमतंगराक्षस ॥ देवीआलीयमुनाचळस ॥ पर्वतींकरूनिरहिवस ॥ कायकरितीझालीपुढें ॥५॥

आणिकल्लोळाअदिककरूनितीर्थें ॥ जींपूर्वीवर्णिलींपुण्यवंत ॥ त्यावेळींकितीआहेत ॥ तितकीवर्णनकरावी ॥६॥

ऐकोनऋषीचाप्रश्न ॥ स्कंदवदेऋषीलागुन ॥ अगणिततिथेंपरमपावन ॥ यायमुनागिरीवरीअसती ॥७॥

साकल्यवर्णावयाप्रती ॥ मजनाहीयेवढीशक्ति ॥ तरीथोडीसांगेनतुम्हांप्रती ॥ ऐकातुम्हीआदरें ॥८॥

तरींदेवीच्यादक्षिणभागासी ॥ तीर्थाअहेपापनाशी ॥ जेथींचेंजळपुण्यराशी ॥ गंगाजलसमान ॥९॥

जेथेंसाक्षातमहेंद्रयेऊन ॥ मुक्तझालापापापासीन ॥ ऋषीम्हणतीपापाचरण ॥ कयइंद्रेकेलेंहोतें ॥१०॥

कैसाझालापापमुक्त ॥ तोसांगावावृत्तांत ॥ स्कंदम्हणेब्रह्मसुत ॥ मरिचीत्याचासुतकश्यप ॥११॥

कश्यपाचात्वष्टासुत ॥ त्याचापुत्रवृत्रविख्यात ॥ पार्वतीशापास्तवनिश्चित ॥ असुरभावपावला ॥१२॥

चराचरलोकासहित ॥ वृत्रेंजिंकिलेदेवसमस्त ॥ इंद्रेमारिलारणांत ॥ वज्रशस्त्रेंकरोनी ॥१३॥

ब्रह्माहत्येनेंइंद्रासी ॥ आवृत्तकेलेंवेगेंसी ॥ ब्रह्मादेवेंत्याब्रह्माहत्येसी ॥ चहूंठायींविभागिलें ॥१४॥

एकभागदिधलाअग्नीसी ॥ दुजाजलासीतिसरास्त्रियांसी ॥ देऊनीचवथ्याभागासी ॥ वृक्षामध्येंठेविलें ॥१५॥

देवेंद्रझालापापमुक्त ॥ स्नानकेलेंपवित्रजळात ॥ तेणेतीर्थझालेंविख्यात ॥ पापनाशन उत्तम ॥१६॥

अमावास्यासोमवतीं ॥ ज्याकालीयेईलनिश्चितीं ॥ त्यादिनींस्नानकरितांहोती ॥ कोटीगुणेसुकृतें ॥१७॥

वैशाखमासींसुर्योदयीं ॥ जितेंद्रियजितक्रोधयुक्तपाही ॥ एकमासस्नानकरितीलवलाही ॥ त्यांचेपितृगणमुक्तहोती ॥१८॥

ब्रह्महत्यादिपापापासुन ॥ मुक्तहोयनलागतां ॥ क्षणास्नानमात्रेंचीहोयपावन ॥ ऐसेंमहिमानयातीर्थाचें ॥१९॥

जोकोणीनरभक्तिमान ॥ यातीर्थाप्रतीयेऊन ॥ पितृपक्षीपितरोद्देशेंजाण ॥ नित्यश्राद्धकरीलजो ॥२०॥

तोयालोकीसुखभोगुन ॥ अंतीपितरासहस्वर्गींजाऊन ॥ ब्रह्मादेवाचादिवसपुर्ण ॥ तोकालपितरासहराहे ॥२१॥

पापनाशतींर्थींस्नानकरील ॥ परमपदासीपावेल ॥ बहुकायबोलूबोल ॥ ऐसेंतीर्थनसेपृथ्वीवरी ॥२२॥

देवीच्यापश्चिमभागासी ॥ नृसिंहतीर्थनामज्यासी ॥ अतिशुभदायकपापनाशी ॥ सर्वदेवांनींसेविलेंजें ॥२३॥

तेथेंसाक्षातश्रीहरी ॥ प्रल्हादवरदनरहरी ॥ वरदेऊनीस्वनामेंकरी ॥ नृसिंहतीर्थम्हणोनी ॥२४॥

यातीर्थासयेऊन ॥ करावेंमुडंणपूर्वकस्नान ॥ पितराचेंश्राद्धकरून ॥ मगपूजीलदेवीसजो ॥२५॥

तोशक्तिच्यालोकासजाऊन ॥ शक्तिसारुप्यपाऊन ॥ चिरकालवासकरीलजाण ॥ संशययेथेंनधरावा ॥२६॥

अमावस्यासंक्रांत व्यतिपात ॥ युगादिमन्वादिपर्वप्राप्त ॥ त्यादिवशींश्रद्वान्वित ॥ श्राद्धकरीलजोनर ॥२७॥

तोनरकस्थसर्वपितरासी ॥ मातृपितृकुलोद्भवासी ॥ आपणासहनेईलत्यासी ॥ उर्ध्वलोकासीनिश्चियें ॥२८॥

पितृलोकींपितरांसहित ॥ ब्रह्मादेवाच्यादिवसपर्यंत ॥ तोकालराहुनीसुख अत्यंत ॥ पावेलतोनिश्चयें ॥२९॥

प्राप्तझालीयाएकादशी ॥ स्नानकरोनीयांतीर्थासी ॥ जोपूजिलनरहरीसी ॥ निराहारीहोऊनी ॥३०॥

तोपावेलवैकुंठासी ॥ संशयनधरावामानसीं ॥ नृसिंहतीर्थमहात्म्यतुजसी ॥ म्यांसर्वहीवर्णिलें ॥३१॥

यातीर्थाच्यानैऋत्यदिशेसी ॥ मुद्गलतीर्थनामज्यासी ॥ अतिउत्तमपूण्यराशी ॥ दर्शनहोयजयच्या ॥३२॥

मुद्गलनामविप्रऋषीं ॥ जेथेंपावलापरमसिद्धिसी ॥ श्रीशंकराचाप्रसादज्यासी ॥ झालाउत्तमप्रकारें ॥३३॥

शंकराच्याआज्ञेकरुण ॥ तीर्थझालेंपरमपावन ॥ ज्यातीर्थाचस्ननेंकरुन ॥ मनोरथसर्वपूर्णहोती ॥३४॥

कृष्णपक्षींचतुर्दशीतिथी ॥ शिवरात्रीजीसम्हणती ॥ निराहारस्नानकरोनीनिश्चिती ॥ होतीशिवध्यानपरायणजे ॥३५॥

दिपावळीलाऊनीविविध ॥ जागरकरावारात्रींप्रसिद्ध ॥ धत्तुरपुष्पेविल्वेंशुद्ध ॥ शंकरासेपुजितीजे ॥३६॥

शुभ्राक्षताचंदनसुगंध ॥ धृपदीपनैवेद्यशुद्ध ॥ भक्षभोज्यपक्कान्नैंविविध ॥ समर्पावेंदेवासी ॥३७॥

कर्पूरसंभवदीप ॥ घृतयुक्तवातीचेअमूप ॥ फूलवातीऊर्ध्वदीप ॥ माणिकवातीबेलवाती ॥३८॥

अनेकदीपांचेप्रकार ॥ छत्रचामरादिउपचार ॥ गीतनृत्यवद्यगजर ॥ स्तोत्रवेदपुराण इत्यादी ॥३९॥

शंकरप्रसादेंकरुन ॥ यालोकींसुखसंपन्न ॥ अंतींशिवलोकप्राप्तीपुर्ण ॥ होतसेसुखीसर्वदा ॥४०॥

ऐसींतीर्थेंअनेकअसती ॥ संक्षेंपेंकथिलेंतुम्हांप्रती ॥ कयान्याइकावयाप्रती ॥ इच्छाअसेलतेंसांगा ॥४१॥

तेंमीतुम्हांसकरीनकथन ॥ बोलेऋषीप्रतीषडानन ॥ ऐकाएकाग्रकरुनीमन ॥ शंकरम्हणेवरिष्ठासी ॥४२॥

येथेंअध्यायझालापुर्ण ॥ म्हणेपांडुरंगजानार्दन ॥ पुढीलकथेंचेंअनुसंधान ॥ श्रवणाविषयींअसोद्यावें ॥४३॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडेतुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ तीर्थप्रशंसानामसप्तदशमोध्यायः ॥१७॥

श्रीजगंदबार्पणस्तु ॥ शुभंभवस्तु ॥