अध्याय २५
श्रीगणेशायनमः ॥ जयतुरजादेवीविश्वजननी ॥ माझेंमनहेंतुझ्याचरणीं ॥ अखंडराहोस्थीरहोऊनी ॥ चांचल्यसोडोनीसर्वदा ॥१॥
स्कंदसांगतकथासुरस ॥ यमुनाचलाच्यानैऋत्यदिशेस ॥ दुरतरीआठकौस ॥ स्थानमार्कंडायऋषींचें ॥२॥
मृकंडतनयदेवीपुजक ॥ तेथेंतपकरिताझालसम्यक ॥ ॠषीपुसतीषण्मुखाकौतुक ॥ कथासांगाविस्तारें ॥३॥
केव्हामृकंडतनयेंजाण ॥ कोणाचेंकेलेंआराधन ॥ तेंसर्वहीकरीकथन ॥ आम्हालागींयेवेळीं ॥४॥
स्कंदम्हणेभार्गवनंदन ॥ भार्कडेयप्रतापवान ॥ तपश्चर्याशरीरशोषण ॥ अतिकठिनकरिताझाला ॥५॥
देवीसुक्ताचापाठकरुन ॥ अयुतवर्षेकेलेंअनुष्ठान ॥ खणुनकुंडकेलोंनिर्माण ॥ त्रिकाळस्ननकरीतसे ॥६॥
नित्यकर्मसारुन ॥ सदाकरीअनुष्ठान ॥ वायुआहारसेवुन ॥ क्षुधातृषाजिंकिलीं ॥७॥
जितेंद्रियाजितप्राण ॥ जितासनहोऊनपूर्ण ॥ नवहीरंध्रेरोंधून ब्रह्मारध्रीमनठेविलें ॥८॥
ब्रह्मारंध्रापासोनधुम्र ॥ उद्भवलालोकभयंकर ॥ जगव्याकूळझालेंसमग्र ॥ देवासीभयथोरझालें ॥९॥
तेव्हाइंद्राएकाशंकाधरुन ॥ देवगुरुसीबोलेवचन ॥ कोणहातपकरितोदारुण ॥ कोनाचेस्थानघेउपाहे ॥१०॥
माझेंकिंवा अन्यदेवाचें ॥ स्थानजिंकावयासावें ॥ कठीणतपाआचरितसेयाचें ॥ उपशमनकैसेंहोईल ॥११॥
शीघ्रौपायसांगायासी ॥ गुरुम्हणेआशंकानधरीमानसी ॥ हानिष्कमतपोराशी ॥ देवीभक्तदृढव्रत ॥१२॥
श्रीविष्णुप्रतीत्यर्थजाण ॥ तपश्चर्याकरितसेदारुण ॥ तुझेंकिंवाइतरदेवाचेंस्थान ॥ इच्छितनाहींकिंचित ॥१३॥
त्वास्थीरासावेंअंतरी ॥ शंकासोडोनीदेइदुरी ॥ मगतोगुरुवचनेंवृत्रारी ॥ कांहीकाळनिःशंकराहिला ॥१४॥
पुढेंकांहीकाळेंकरुन ॥ इंद्रझालाशंकायमान ॥ मदनवसंतअप्सरागण ॥ आज्ञाकरीततयासी ॥१५॥
तुम्हीमृत्युलोकीजाऊन ॥ मार्कंडेयासीकराविघ्न ॥ त्याचीतपश्चर्याभंगुन ॥ शिघ्रयावेंमजपासीं ॥१६॥
अतिनिग्रहनकरुण ॥ तुम्हींआपुलेंकरोनीरक्षण ॥ युक्तिनेंत्याच्यातपासीभंगुन ॥ सत्वरयावेंमजपाशीं ॥१७॥
स्कंदम्हणेऐकामुक्नीगण ॥ इंद्राजीआज्ञाशीरसामान्य ॥ करोनीमदनअप्सरागण ॥ वंसतासहितानिघाले ॥१८॥
शिघ्राअलेभूतळावर ॥ जेथेऋषीतपकरीतसेदुस्तर ॥ वसंतेश्रृगारिलेंवनसमग्र ॥ मगचतुर्विधकामिनी जातीच्या ॥१९॥
हावभावयुक्तनागर ॥ सर्वहीस्त्रियालावण्यसागर ॥ ज्यांचेदर्शनेचहोयविकार ॥ तरुणपुरुषांचेचित्तासी ॥२०॥
चित्तांतखंडतरेमदनबाण ॥ तेणेंव्याकुळहोतसेमन ॥ विवेकविचारदेहभान ॥ नाठवेकांहींपुरुषांशी ॥२१॥
ऐशावर्गाअनरुपसंपन्न ॥ भूतळीउतरल्याविमानांतुन ॥ मुकंडतनयासीअवलोकून ॥ प्रलोभितकरूप्रवर्तल्या ॥२२॥
मदनाचेजाणूनीअणुमत ॥ मनासीशोभवीवंसत ॥ अकाळीकाळनसुनिवनांत ॥ शोभापातलीधवां ॥२३॥
पुष्पीतझालेवृक्षसकळ ॥ वेलीआरक्तकोमलदळ ॥ पुष्पकळिकागुच्छविशाळ ॥ सुकुमारतरुणस्त्रियाजैशा ॥२४॥
पुष्पभारेंवेलीलवती ॥ वृक्षखांद्यावरीचढती ॥ जैशानवयौवनायुवती ॥ आलिंगनदेतीपुरुषासी ॥२५॥
अशोकवृक्षवनींशोभती ॥ परितोसशोकमनालागींकरिती ॥ स्त्रीविरहेंपुरुषांप्रती ॥ पुरुषवियोगेंस्त्रियांसी ॥२६॥
कींशुकाआरक्तपुष्पेंशोभती ॥ अनेकवृक्षांचियाजाती ॥ पत्रेंपुष्पेंफलेंलवती ॥ ज्ञानघनसंपन्नसाधुजैसे ॥२७॥
अलंकृतवनादिसेंसकळ ॥ वायुचीझलुकचलेंमंजुळ ॥ मंदसुगंधसुखशीतळ ॥ अनेकपक्षीशब्दकरिती ॥२८॥
कोकिळागातीपंचमश्वरें ॥ तेणेंविराहिणीस्त्रियांचेंचित्तझुरें ॥ स्त्रीवियोंगेंपुरुषघावरें ॥ मोहितहोतीकामबाणें ॥२९॥
तेव्हांस्त्रियाकरोनीशृगार ॥ आल्यामृकंडतनयासमोर ॥ हावभावेंपरमचतुर ॥ नृत्यारंभकरित्याझाल्या ॥३०॥
नृत्यगीतववाद्यसुंदर ॥ उत्तमतालधरुनीसुस्वर ॥ वाद्येंवाजवितीमधुर ॥ पूर्वरागदिततेव्हानटी ॥३१॥
छंदमयुरस्वीकारुन ॥ शार्दुललघुपूर्वकरुन ॥ स्वहस्ताग्रीदृष्टिठेवुन ॥ मनासीठेविलेंतेथेंची ॥३२॥
षडजयमध्यमधैवत ॥ इत्यादीरागंचेंरुपनिश्चित ॥ दाखवूननृत्यकलादावीत ॥ पादगतीनेंतेधवा ॥३३॥
करद्वयहृदयींठेवुन ॥ परस्परत्यासन्मुखराहुन ॥ सरळग्रीवाकरुननयन ॥ पादतळसमानकरुनियां ॥३४॥
जानुगुल्फजंघासुरेखा ॥ संपुष्ठाकारकरुनियेका ॥ शरीराआकुंचनकरुनिदेखा ॥ र्हास्वकरितीआपणासी ॥३५॥
श्रीरंगनतीपूवकरुन ॥ पश्चातदक्षिणपदीभ्रमण ॥ चक्रवतकरुनजाण ॥ पुर्वरंगातेंसोडोनियां ॥३६॥
नटवशस्त्रप्रमाणयुक्त ॥ उत्तमशिक्षालाधली समस्त ॥ अप्सरात्यानूत्यकरीत ॥ हावभावदाऊनी ॥३७॥
अंगचलननेत्रमोडुन ॥ बाहुमुलप्रदर्शितकरुन ॥ चित्तासीघेतीहिरोन ॥ तरुणपुरुषाचेंतात्काळ ॥३८॥
सुक्ष्मवस्त्रेंपरिधानकेलीं ॥ तोंवयुवेगेंउडालीं ॥ तेणेंजघायुग्मउघडींझालीं ॥ गुल्फउरुइत्यादी ॥३९॥
मन्मथाचेउत्पादक ॥ ऐशाचेष्टाकेल्याअनेक ॥ ऋषीच्याजवळीयेऊनीयेक ॥ करुणाविलापकरितसे ॥४०॥
अप्सराम्हणेविग्रोत्तमा ॥ कांव्यर्थकरिसीतपःश्रमा ॥ अष्टांगयोगकष्टभ्रमा ॥ सोडीदुश्चरतपासी ॥४१॥
आम्हींसांगुतेंऐकसी ॥ तरीपरमसौख्यासीपावसी ॥ तपतेंसुलभपुढेंतुजसी ॥ परिस्त्रीसंयोगपुढेंदुर्लभ ॥४२॥
ज्याच्याकटाक्षाचेबाण ॥ देवलोकीहीदुर्लभजाण ॥ आमुचेंअधरोष्ठसुधापान ॥ अभाग्यासीदुर्लक्ष ॥४३॥
समग्रतपाचेंफळहेंजाण ॥ आमुचेंमुखाचेंचुंबन ॥ करितांचप्राप्तहोयपूर्ण ॥ तरीशिघ्रयावेंआम्हांजवळीं ॥४४॥
पुण्यपदरींनाहीज्यासी ॥ आमुचेंआलिंगनदुर्लभत्यासी ॥ स्त्रीबाहुसंलग्रज्याच्यागळ्यासी ॥ नसेतोव्यर्थपशुजैसा ॥४५॥
म्हणेपाडुरंगजनार्दन ॥ येथेंअध्यायझालापुर्ण ॥ उत्तराध्यायीसंभाषणं ॥ अप्सरेचेंबहुअसती ॥४६॥
इतिश्रीस्कदंपुरानेसह्याद्रीखंडेतुरजामाहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ पंचाविंशोध्यायः ॥२५॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥