Android app on Google Play

 

अध्याय १५

 

श्रीगणेशायनमः ॥ यस्याःपादप्रसादेनजीवंतिविबुधाअपितांमबामनसा ॥ नित्यंचितंयामिपरांशिबां ॥१॥

शंकरवरिष्ठासीसांगत ॥ मातंगाचेंसैन्यसमस्त ॥ चतुरंगबलान्वित ॥ पदातिरथगजवादी ॥२॥

हेमघंटाश्रृंखळायुक्त ॥ गंडस्थळींमदस्त्रवत ॥ गजसौविशतीअयुत ॥ अर्बुदसंख्यारथअसती ॥३॥

रथचालतीघडघडाट ॥ हेमंकिंकीणीखळखळाट ॥ रथारुढराक्षसउद्धट ॥ युद्धकुशलनिघाले ॥४॥

दशकोटीशामकर्ण ॥ त्वावरीराक्षसाअरुढहोऊन ॥ निघालेतैसेचरक्षकगण ॥ शस्त्रधारीअसंख्यात ॥५॥

खंडचर्मघेउनीहातीं ॥ विचित्रमंडळेउड्यामारती ॥ एकपुढेंएकधांवती ॥ पदातिवीरतेधवां ॥६॥

हयशीर्षराक्षसेश्वर ॥ ज्याच्यारथासीआयुतखर ॥ बलपराक्रमीथोर ॥ अक्षौहिणीसेनाज्याची ॥७॥

सेनापतिराक्षसेश्वर ॥ पातलादेवीच्यासमोर ॥ तैंसेचराक्षघेऊनीइतर ॥ रथगजादीपरिवार ॥८॥

ऐसेंसैन्यपरिवारसहित ॥ मातंगराक्षसबलगर्वित ॥ धनुष्यघेवोनीहातांत ॥ पाठीसीभातेबाणाचें ॥९॥

बांधुनीगोधांगुलीत्राण ॥ कवचमुगुटशोभायमन ॥ नानाअलंकारलेवून ॥ समरगणींपातला ॥१०॥

नानावाद्यांचेगजर ॥ भेरीदुंदुभीपणवझर्झर ॥ गोमुखतालमृदंसुर ॥ श्रृंगवेणुइत्यादी ॥११॥

सिंहनादवीरांचेअदभुत ॥ अश्वहस्तिनीगजबृंहित ॥ नदक्ष्वेडितस्फोटित ॥ आकाशपूर्णजालेंसे ॥१२॥

देवीसैन्यनादेंझालेआवृत्त ॥ राक्षससैन्यभयकंरबहुत ॥ पाहुनीदेवीयोगिनीसहित ॥ सिंहनदकरीथोर ॥१३॥

राक्षासासीकरोनीक्षोभित ॥ सैन्यावरीवेगींधांवत ॥ प्रवर्तलाशस्त्रसंपात ॥ नाशव्यावयाराक्षसांचा ॥१४॥

बाणवृष्टिशक्तिवृष्टी ॥ परशुशूलखंगवृष्टी ॥ पाषाणकुंततोमरवृष्टी ॥ राक्षसावरीकरितसे ॥१५॥

वाहनारुडहोउनीपाही ॥ मातृकापातल्यालवलाही ॥ ऐंद्रीमहेश्वरीब्राह्मीवाराही ॥ कौमारीवैष्णवीनारसिंही ॥१६॥

आठवीमातृकातींसहासी ॥ त्यांनीपारिवेष्टितपरमेश्वरी ॥ राक्षससैन्याचेसंहारी ॥ प्रवर्तलीतेकाळीं ॥१७॥

चक्रघेऊनहातांत ॥ गजशुंडाद्विखंडकरीत ॥ गंडस्थळविदारीत ॥ मस्तकतोडीतअश्वाचें ॥१८॥

वीरांचेंहृदयफॊडीत ॥ रक्तनद्यावाहुंलागत ॥ मांसर्कदमअस्थिदिसत ॥ दगडापरीतेधवां ॥१९॥

वीरांचेकेशतेंशेवाळ ॥ मस्तकेंदीसतीजैंसेकमळ ॥ प्रेतेंवाहतीसुसरीविशाळ ॥ दिसतींरत्‍नेंवाळुका ॥२०॥

भूमीसीलोळतीशस्त्रधायी ॥ हाहाःकारकरितीसर्वही ॥ हातांतपुत्रहीआइ ॥ घुतमीघायाळसैन्यांत ॥२१॥

रक्तनदीवाहेथोर ॥ जैसीयमद्वारनदीघोर ॥ भ्याडासीअतिभयंकर ॥ शुरासीहर्षवाढवीत ॥२२॥

योगिनीआनंदेंनाचती ॥ बहुभोजनमिळलेंम्हणती ॥ मांसरक्तपक्कान्नेंआयती ॥ रणभूमीताटांतवाढिलींहे ॥२३॥

ऐसेंसैन्यझालेंक्षीण ॥ हेंहयग्रौवराक्षसेंपाहुन ॥ कोपेंकडकडा ओठचाऊन ॥ शरजाळेंदेवीसंविंधीत ॥२४॥

सिंहासीखडगानकेलाप्रहार ॥ ब्रह्माणीवरीसोडीदहाशर ॥ कौमारीवरीआठशर ॥ सोडितांझालाराक्षस ॥२५॥

शक्तिप्रहारवाराहिसी ॥ गदाप्रहारवैष्णवीसी ॥ मुष्टीघातमाहेश्वरीसी ॥ करितांझालाराक्षसतो ॥२६॥

नारसिंहिंविंधिलेंतोमरें ॥ ऐंद्रिवरीसोडलीं अनेकशस्त्रें ॥ महाअस्त्राजाळत्वरें ॥ जगदंबेवरीसोडिलें ॥२७॥

सोडोनियांशस्त्रजाळें ॥ सर्वयोगिनीसीवेगळे वेगळे ॥ प्रहारकारीततैवेळें ॥ देखोनीअंबाक्षोभली ॥२८॥

राक्षसाच्याहृदयावरी ॥ वेगेंशस्त्रप्रहारकरी ॥ परीतोनचळेपाऊलभरी ॥ पर्वतजैसावायुनें ॥२९॥

राक्षसेंकोपोनीतयेवेळे ॥ देवीअरीशस्त्रसोडिलें ॥ शरशक्तितीक्ष्णभाले ॥ देवीनेंछेदिलेवरचेवरी ॥३०॥

अर्धचंद्रबाणेंकरून ॥ देवीनेंत्याचेंधनुष्यछेदन ॥ रथसारथीअश्वमारुन ॥ विरथकेलाराक्षसती ॥३१॥

राक्षसेंधांवोनीवेगेंसी ॥ गदेनेंताडिलेंसिंहासी ॥ देवीनेंछेदूनत्याच्यागदेसी ॥ हृदयींताडिलेंशुलानें ॥३२॥

शुलद्यायेंमुच्छितहोऊन ॥ भूमीवरीपडला अचेतन ॥ पुन्हांमूर्छासावरून ॥ शक्तिसोडितदेवीवरी ॥३३॥

देवीनैहुंकारकरुन ॥ भूमीवरीपाडिली शक्तिजाण ॥ शक्तिव्यर्थनासलीपाहुन ॥ राक्षसेंमुद्ररसोडिला ॥३४॥

तोहीहुंकारेंकरुन ॥ भुंमीवरीपावलापतन ॥ मगदेवीकोपेंआरक्तनयन ॥ होऊनियात्यासमयीं ॥३५॥

चक्रघेऊनियांकरीं ॥ शिरच्छेदकरावालाकरी ॥ तितक्यांततोराक्षसझडकरी ॥ अंतर्धानपावला ॥३६॥

गुप्तहोतांचहयग्रीवराक्षस ॥ विस्मयझालादेवीस ॥ मगत्याच्यासैन्याचानाश ॥ क्षणांतकरीजगदंबा ॥३७॥

सैन्यविध्वंसिलेंसकळ ॥ हेंपाहुनियांमहाबळ ॥ सुंदनामाराक्षसतात्काळ ॥ उठावलायुद्धासी ॥३८॥

देवीसहितसिंहासी ॥ सत्तरबाजींविंधीवेगेंसी ॥ सिंहनादउच्चकरोनीअंबेसी ॥ पुन्हांआठबाणेंविंधीत ॥३९॥

योगिनीच्यासमुद्रायासी ॥ दहादहाबाणेंविंधीत्वरेंसी ॥ अंबेनेंनिवारुनीत्याच्याबाणासी ॥ शस्त्रेंत्यासीताडिले ॥४०॥

बाणसोडुनधनुष्यामोडिलें ॥ बाणभातेविध्वंसिलें ॥ खंगतोडोनीटाकिलें ॥ ध्वजछेदुनपाडीला ॥४१॥

त्रिवेणुनीडसहितरथ ॥ चूर्णकरोनीअश्वासीमरित ॥ सारथ्याचेंमस्तकत्वरित ॥ छेदुनीपाडिलेंधरणीवरी ॥४२॥

सुंदराक्षसझालविरथ ॥ गदेनेंदेवींसीप्रहारकरित ॥ सवेंचिदुसर्‍यारथांत ॥ बैसोनीयुद्धासीपातला ॥४३॥

देवीनेंतोहीमोडिसारथ ॥ पाहुनीकोपलाराक्षसबहुत ॥ पुन्हांबैसोनीअन्यरथांत ॥ सुंदराक्षसपातला ॥४४॥

तोहीदेवीनेंमोडिलारथ ॥ पुन्हाज्याज्यारथींआरुढत ॥ तेतेरथचूर्णकरीत ॥ क्षणनलागतांजगदंबा ॥४५॥

ऐसेकोटीसंख्यारथ ॥ तत्क्षणींविध्वसिलेसमस्त ॥ पुन्हांबैसोजायअन्यरथांत ॥ सुंदराक्षसत्वरेनें ॥४६॥

तोतितक्याअवसरांत ॥ देवीनेंशुलघेवोनीत्वरित ॥ राक्षसाच्याहृदयींमारीत ॥ मगतोपडिलाधरणीवरी ॥४७॥

दणाणलेंधरणीतळ ॥ त्रैलोक्यस्थलघेवोनीत्वरित ॥ चलनपावलेतात्काळ ॥ राक्षसशरीरभारानें ॥४८॥

मगतोराक्षसपावलामरण ॥ देवीनेंवधिलाजाण ॥ उत्तराध्यायींहयग्रीवासमारुन ॥ मातंगराक्षसामारील ॥४९॥

देवहोतीलसुखसंपन्न ॥ सुखीहोतीलविश्वजन ॥ म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ कथाऐकावीसज्जनांनी ॥५०॥

इतिश्रीस्कंदपुराणेसह्यद्रीखंडे ॥ तुरजामहात्मेशंकरवरिष्ठसंवादे ॥ पंचदशोध्यायः ॥१५॥

श्रीजगादंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥