Android app on Google Play

 

अध्याय ११

 

श्रीगणेशायनमः ॥ नमाम्यंबाजगद्धात्री ॥ जगत्कत्रींसुखप्रदां ॥ बुद्धिदांदुःखहंत्रीतांत्रिधामात्परतःस्थितां ॥१॥

स्कंदम्हणेमुनीवर्गासी ॥ वरिष्टएकोनीशिववचनासी ॥ हर्षयुक्तनिजमानसीं ॥ शंकरासीबोलत ॥२॥

म्हणेदेवाधिदेवाजगन्नाथ ॥ भक्तानुग्राहकसमर्था ॥ शिवशंभाउमाकांता ॥ प्रार्थनाएकऐकावी ॥३॥

धारातीर्थजीत्रिवेणीम्हणुन ॥ ऐकूंइच्छितोंतेंमहिमान ॥ आरंभापासोन त्याचेंकथन ॥ सविस्तरकरावें ॥४॥

शंकरम्हणेऐकपरम ॥ धारामाहत्म्यजेंउत्तम ॥ ज्याच्यास्मरण मात्रेंकरून ॥ ब्रह्मव्हावयायोग्यहोती ॥५॥

आवाहनकरितांचप्रजापती ॥ गंगायमुनासरस्वती ॥ स्वरूपधरोनीयेती ॥ ब्रह्मादेवासन्निध ॥६॥

कल्लोलाच्याउत्तरेसी ॥ सुधाकुंडाचेपूर्वदिशेसी ॥ आल्यापश्चिममुखवेगेंसी ॥ देवीसीअभिषेककरावया ॥७॥

लोकासीपावनकरावयासी ॥ धारातीर्थाअलेंप्रसिद्धीसी ॥ निष्पाप करोनीजनासी ॥ सभ्दक्तीसीदेतसे ॥८॥

कल्लोलतीर्थीस्नानकरून ॥ धारातीर्थींकरितास्नान ॥ सत्पजन्माचेंपापदारूण ॥ नाशतीब्रह्महत्यादि ॥९॥

पंचमहापातकेंउपपातके ॥ गोवधाअणिइतर पातकें ॥ अगम्यागमनादिपातकें ॥ स्थुलसुक्ष्मकेलीजे ॥१०॥

कामकृताकोमकृत ॥ दाक्षिण्यअर्थ लोभकृत ॥ भीतीदुष्टसंगतीकृत ॥ सर्वनाशतीक्षणमात्रें ॥११॥

निष्पापहौनीवेगें ॥ मोक्षमार्गतया लागे ॥ तेंहीसांगतोंप्रसगें ॥ लक्षणमोक्षमार्गाचें ॥१२॥

सत्वगुणाचीअधिकवृद्धि ॥ रजतमरहित चित्तशुद्धि ॥ साधनचतुष्टयसमृद्धि ॥ सत्संगतीचीआवडी ॥१३॥

सदगुरुमुखेंवेदांतश्रवण ॥ त्याचें मनननिदिध्यासन ॥ मनोजयवासनाक्षयकरून ॥ निर्विकल्पयोगसाधावा ॥१४॥

यासीम्हणाएमोक्षमार्ग ॥ निष्पापझालियाफवेलचांग ॥ निष्पापव्हावयायथासांग ॥ तीर्थस्नानकरावें ॥१५॥

तीर्थस्नानेंपापझडे ॥ तीर्थस्नानेंपुण्यजोडे ॥ मगत्यासीबहुआवडे ॥ संगातिसाधुजनाची ॥१६॥

मोक्षसाधनाचेंमुळ ॥ सत्संगचएकप्रबळ ॥ सत्संगप्राप्तीसीमूळ ॥ चित्तशुद्धपाहिजे ॥१७॥

चित्तशुद्धीचेंहीमूळ ॥ तीर्थस्नानहोयनिर्मळ ॥ यास्तवप्तुमुक्षुसकेवळ ॥ तीर्थस्नानपाहिजे ॥१८॥

प्राप्तझालियाकार्तिकमास ॥ अरुणोदयाचेसमयास ॥ जेनरकरितीस्नानास ॥ एकमासपर्यंतभक्तीनें ॥१९॥

दृढव्रताएकान्तभोजन ॥ सर्वेंद्रियासकरूनदमन ॥ ब्रह्माचर्यव्रतसंपन्न ॥ धारातीर्थींनाहातीजे ॥२०॥

धारातीर्थीकरुनीस्नान ॥ करितीआंबिकेचेंपूजन ॥ तेयालोकीसुखसंपन्न ॥ जाणासुखभोगनी ॥२१॥

अंतींपावतीवैकुंठभुवन ॥ जेंइतरदेवासीदुर्लभस्थान ॥ विष्णुलोकसनातन ॥ प्राप्तहोयतयासी ॥२२॥

त्र्यैलोक्यपूज्यवरिष्ठ ॥ देवांमाजींविष्णुश्रेष्ठ ॥ पर्वतीमांजींमेरूश्रेष्ठ ॥ सागरांमाजींक्षीराब्धी ॥२३॥

नागांमध्येंशेषश्रेष्ठ ॥ क्षेत्रसंमाजींकाशीवरिष्ठ ॥ तेजसामाजींअतिश्रेष्ठ ॥ सूर्यनारायणजैसा ॥२४॥

पक्षियांमाजींगरुडश्रेष्थ ॥ वेदांमध्येंसामवरिष्ठ ॥ मनुष्यांमध्येनृपश्रेष्ठ ॥ गंगाश्रेष्ठनद्यांमाजीं ॥२५॥

जैसेशास्त्रांतवर्णिलेश्रेष्ठ ॥ तैसेतीर्थीमध्येंश्रेष्ठ ॥ धारातीर्थाअहेश्रेष्ठ ॥ शंकरम्हणतीवरिष्ठासी ॥२६॥

पृथ्वीतीलतीर्थपवित्र ॥ आदिकरोनीकुरुक्षेत्र ॥ धारातीर्थकलामात्र ॥ सोळवीहीनसेकोणा ॥२७॥

पर्वव्यतिपातसंक्राती ॥ युगादिमन्वादिदर्शतिथी ॥ पितृपक्षादिवर्षदिनप्राप्ती ॥ धारातीर्थीजेनर ॥२८॥

स्नानकरोनीश्राद्धेंकरितीं ॥ पक्कान्नेंअमान्नेजैसशिक्ति ॥ सुवर्णफलमूलौदकेंकरितीं ॥ श्रद्धायुक्तजेनर ॥२९॥

त्याचेपुण्यफळाऐक ॥ वरिष्ठासीसांगतोदेख ॥ पित्याचेपूर्वजदशसंख्याकं ॥ मातेचेपूर्वदशसंख्या ॥३०॥

आपणाआपुलें स्वजनासकट ॥ एकविंशतीपुरुषांसीस्पष्ट ॥ उत्तमगतीसीपावतीतवरिष्ट ॥ पुनरावृत्तीत्यानाहीं ॥३१॥

संक्षेपेंमहात्म्यधारातीर्थाचें ॥ वरिष्ठातुजम्यांवर्णिलेंसाचें ॥ आतांमहात्म्यसुधाकुंडाचें ॥ ऐकसांगतोंतुजलागीं ॥३२॥

जेंतीर्थपापक्षयकारक ॥ स्वर्गमोक्षप्रदायक ॥ तेथेंस्नानकरूनीभक्तिपूर्वक ॥ अंबिकेसीपूजिती ॥३३॥

जेमनुष्ययथाशक्ति ॥ देवऋषीपितरांसीयजिती ॥ तेईद्रभुवनासीजाती ॥ अर्धासनभोगितीइंद्राचे ॥३४॥

ब्रह्मायाचादिवसपर्यंत ॥ इंद्रलोकीपुज्यहोत ॥ जोसुधाकुंडाचिंजळप्राशीत ॥ प्राप्तमृत्युटळेत्याचा ॥३५॥

सप्तजन्मार्जिंतकर्माचा ॥ क्षयहोयाअसेचा ॥ ऐसामहिमायतीर्थाचा ॥ शंकरबरिष्टसीसांगत ॥३६॥

सुधाकुंडाऐसेंपाहीं ॥ तीर्थपूर्वीझालेंनाहीं ॥ पुढेंऐसेंणारनाहीं ॥ महिमायाचाअग य ॥३७॥

भौमवार अष्टमीआलीयाजाण ॥ सुधाकुंडीकरोनीस्नान ॥ करावेंअंबिकेचेंपूजन ॥ सुगंधउपचारेंकरुनी ॥३८॥

सुवासिनीब्राह्मणासभोजन ॥ द्यावेंयेथेष्टकरुतीमिष्टान्न ॥ तरीतोईहलोकींबहुसुखभोगून ॥ अंतीपरमधामाप्राप्तहोय ॥३९॥

सुधाकुंडाचेंदर्शनस्पर्शन ॥ पानकरितांअवगाहन ॥ तरीतो अमृत्वपावेपूर्ण ॥ हेंमाझेंभाषणसत्यसत्य ॥४०॥

आतांब्रह्मकूपाचामहिमा ॥ तुजसांगतोंद्विजोत्तमा ॥ सर्वलोकांतश्रेष्टब्रह्मा ॥ मीहीआज्ञापाळितों ॥४१॥

देवीचेअग्रभागींस्थिती ॥ ब्रह्माज्ञेनेंमाझीनिश्चिती ॥ कधीपासोनीझालीनिगुती ॥ तेंहीतुजसांगतों ॥४२॥

ब्रह्मानिर्मींतस्वालयांत ॥ ज्यादिनीदेवीझालीस्थित ॥ त्यादिनींमीपार्वतीगणासहित ॥ देवीसन्निधराहिलों ॥४३॥

माझेस्थानाचे आग्नेयकोणी ॥ ब्रह्मादेवेंकूपखानोनी ॥ स्वयेंराहिलातयेस्थानीं ॥ ब्रह्माकूपनामत्यासी ॥४४॥

ब्रह्माकूपीस्नानकरुन ॥ ब्रह्मयाचेंकरिजोपुजन ॥ तोयालोकीसुखभोगुन ॥ अंतीजायब्रह्मालोकां ॥४५॥

धारातीर्थाचेंपूर्वप्रदेशीं ॥ विष्णुतीर्थम्हणतीत्यासी ॥ तेथेंसाक्षातवैकुंठविलासी ॥ स्वयेंप्रगटझालाअसे ॥४६॥

लोकानुग्रहकरावयासी ॥ अत्रीगोत्रोद्भाविप्रासी ॥ प्रसन्नहोऊनी वरासी ॥ द्यावयाविष्णुप्रटला ॥४७॥

वरिष्ठपुसेशंकरालागुन ॥ अत्रीगोत्रोद्भवब्राह्मण ॥ कायत्याचेनामाभिधान ॥ कृपाकरूनीमजसांगा ॥४८॥

तेणेंकायजपहवनकरून ॥ प्रसन्नकलाहरिभगवान ॥ तेंसर्वहीमुळापासोन ॥ देवामजलासांगावें ॥४९॥

शंकरम्हणेत्रेतायुगांत ॥ अत्रीयोगोत्रीजन्मलानिश्चित ॥ गौतमनामाविख्यात ॥ ब्राह्मणएकविद्वान ॥५०॥

श्रुतिस्मृतीपुराण ॥ त्यांतबहुअसेनिपुन ॥ दारिद्रींपीडिलाम्हणुन ॥ पर्यटणकरितसे ॥५१॥

एकदायमुनाचलींयेऊन ॥ जगदंबेचेंदर्शनघेऊन ॥ तीर्थेंअसतींजसिंपूर्ण ॥ पाहतांझालातेव्हांतो ॥५२॥

कल्लोलतीर्थोंकरूनस्नान ॥ केलेंदेवऋषीपितृतर्पण ॥ धारातीर्थीयेऊनाआपण ॥ स्नानकरीताविधीयुक्त ॥५३॥

सुधाकुंडीजलप्राशुन ॥ जगदंबेच्यासन्निधयेऊन ॥ करोनीसाष्टांगनमन ॥ प्रदक्षणाघातली ॥५४॥

नाहींकेलेंभोजन ॥ दुःखेरात्रींनिद्राघेऊन ॥ पुन्हांप्रांतःकाळउठोन ॥ स्नानकरीतकल्लोळीं ॥५५॥

तपकरावयालागून ॥ संकल्पकरिताझाला ब्राह्मण ॥ किंचित्तदूरक्लोळापासोन ॥ स्थाननिर्मिलेंविचक्षणें ॥५६॥

देश्चरदेवदानवासी ॥ ऐसेंआरंभिलेंपासी ॥ एकभुक्तप्रथमादिवसीं ॥ दुसरेदिवशीनक्तकरणें ॥५७॥

तिसरेदिवशीअयाचित ॥ चदथेदिवसेहेंउपोशित ॥ ऐसेम्मासलोटलेबहुत ॥ विष्णुध्यानकरोनियां ॥५८॥

विष्णुमंत्रजपकरुण ॥ नासाग्रींदृष्टिठेवून ॥ चरणांगुलींउभाराहुन ॥ विष्णुचिंतनकरीतसे ॥५९॥

जितेंद्रियनिराहारी ॥ वायुप्राशुनतपकरी ॥ दहावर्षेलोटलींबरीं ॥ आराधनकरितांपैं ॥६०॥

तेव्हांप्रसन्नहोऊनिभगवान ॥ महाविष्णुलौकेकपान ॥ स्वयेंगरुडाख्ढहोऊन ॥ लक्ष्मीसहितपातला ॥६१॥

शंखचक्रगदाधर ॥ कासेशोभेपीतांबर ॥ मूर्तीधनशामसुंदर ॥ सर्वालंकारसंयुक्त ॥६२॥

प्रगटहोवोनिद्विजांसीबोलत ॥ वरमागेरेमनोवांछित ॥ दुर्लभाअसेलतरीनिश्चित ॥ देईनतुजलाद्विजोत्तमा ॥६३॥

उत्तराध्यायीं गौतमब्राह्मण ॥ स्तवकरोनीमागेलवरदान ॥ विनवीपांडुरंगजनार्दन ॥ ऐकालकथातीभाविकहो ॥६४॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रिखंडे ॥ तुलजामहात्म्यें ॥ शंकर वरिष्टसंवादे ॥ एकादशोध्यायः ॥११॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥